
Uddhav Thackeray: शिवसेना उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये संपन्न झाला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. बिहार राज्याला मोदी भरभरुन पैसे देत आहेत, मात्र महाराष्ट्रावर संकट असतानाही दुर्लक्ष केलं जातंय, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.