लोकसभा उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून नावही निश्चित

 लोकसभा उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून नावही निश्चित

मुंबई: लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएने घवघवीत यश मिळवलं. यानंतर मोदींच्या शपथविधीत 18 खासदार असलेल्या शिवसेनेला अवघं एक मंत्रिपद मिळालं आणि तेही अवजड असे कमी महत्वाचे मानले जाणारे खाते. त्यामुळे खासदारांच्या संख्येनुसार मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेना नाराज आहे. तर, शिवसेनेकडून लोकसभा उपाध्यक्ष पदाची मागणी आता भाजपकडे केली जात असून यासाठी शिवसेनेच्या ज्येष्ठ खासदार भावना गवळी यांचे नाव निश्चित झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

भावना गवळी या शिवसेनेच्या ज्येष्ठ खासदार आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून तीनवेळा, तर वाशिम लोकसभा मतदारसंघातून दोनवेळा खासदार झाल्या आहेत. सध्या सलग पाचव्यांदा लोकसभेत शिवसेनेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भावना गवळी यांना यंदा मंत्रिपद मिळण्याची आशा होती. मात्र, शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या एकमेव मंत्रिपदाची माळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांना मंत्रिपद देण्यात आले.

शिवसेना खासदारांमध्ये वरिष्ठ असूनही आणि सलग पाचव्यांदा जिंकूनही मंत्रिपद न मिळाल्याने भावना गवळी नाराज होत्या. मात्र, मंत्रिपदाची संधी हुकलेल्या खासदार भावना गवळी यांना आता लोकसभेचं उपाध्यक्षपद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. खासदारसंख्या पाहता लोकसभेचं अध्यक्षपद भाजपकडे राहील. त्यामुळे लोकसभा उपाध्यक्षपदावर शिवसेनेने दावा केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com