esakal | 'सेनेने काँग्रेसकडे जाहीर केला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार'
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena declares cm candidate front of Congress leaders says Sanjay Raut

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची सुत्रे हाती घ्यावी ही माझ्यासह महाराष्ट्रतील सर्व शिवसैनिकांची इच्छा असल्याचे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले. तसेच, माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नाला उत्तर देताना सेनेने काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीरही केला असल्याचे राऊत यांनी सांगितले.

'सेनेने काँग्रेसकडे जाहीर केला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची सुत्रे हाती घ्यावी ही माझ्यासह महाराष्ट्रतील सर्व शिवसैनिकांची इच्छा असल्याचे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले. तसेच, माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नाला उत्तर देताना सेनेने काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीरही केला असल्याचे राऊत यांनी सांगितले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांच्या बैठकीनंतर बोलताना राऊत म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळूनच राज्यात सरकार स्थापन करणार असून वरिष्ठ पातळीवर यासंदर्भात चर्चा चालू असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार असल्याचा पुनुरुच्चारही यावेळी राऊत यांनी केला. 

शिवसेनेसोबत जाण्यास आघाडीची मंजुरी

मी सतत उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशीही भेट होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांची बैठक झाली असून या बैठकीला सर्व मोठे नेते उपस्थित होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची शिवसेनेसोबत जाण्यासाठी तत्वतः मंजुरी असल्याचेही त्यांनी सांगितले.

loading image