Sharad Pawar : शिंदे गटात नेमकं काय चाललंय? उदय सामंत भरत गोगावलेंसह सिल्व्हर ओकवर

उदय सामंत, भरत गोगावले एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आहेत.
Uday Samant Sharad Pawar
Uday Samant Sharad PawarSakal

राज्याच्या राजकारणात शिवसेनेतल्या बंडापासून रोज काही ना काही नवीन घडामोडी घडत आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून राज्यातलं राजकीय वातावरण तापलेलंच आहे.

अशातच आता शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत प्रतोद भरत गोगावलेंसह शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहे.

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत.

त्यांच्यासोबत आमदार भरत गोगावले हे देखील उपस्थित आहेत. त्यामुळे आता शिंदे गटाचं पवारांसोबत काय शिजतंय अशा चर्चांना उधाण आलं आहे.

या भेटीचं कारणही अद्याप कळू शकलेलं नाही. उदय सामंत यांनी याविषयीचं ट्वीट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी आ. भरत गोगावले, डॉ. प्रदीप ढवळ हे उपस्थित होते, अशा शब्दांत त्यांनी या भेटीची माहिती दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com