Shivsena : 'धनुष्यबाण' हातून गेला; आता पर्याय कोणते? या चिन्हांची उद्धव ठाकरेंची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray Shivsena
Shivsena : 'धनुष्यबाण' हातून गेला; आता पर्याय कोणते? या चिन्हांची उद्धव ठाकरेंची मागणी

Shivsena : 'धनुष्यबाण' हातून गेला; आता पर्याय कोणते? या चिन्हांची उद्धव ठाकरेंची मागणी

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवलं. या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्यात आल्याची चर्चा आहे. यानंतर आता उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीत काही नावे आणि काही चिन्हांचा प्रस्ताव ठेवला आहे.

हेही वाचा: Shivsena : ठाकरे- शिंदेंना हवं असलेलं नवं नावही सारखंच; एकानंतर दुसरा वाद सुरू

ठाकरेंच्या शिवसेनेसाठी संभावित चिन्हे कोणती?

  • त्रिशूळ

  • उगवता सूर्य

  • मशाल

ठाकरेंनी मागितलेली नावे कोणती?

  • शिवसेना बाळासाहेब ठाकरे

  • शिवसेना प्रबोधनकार ठाकरे

  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

हेही वाचा: Shivsena: निवडणूक आयोगाच्या निर्णयातील महत्वाचे 10 मुद्दे

दरम्यान, शिंदे गटापुढे तलवार या निवडणूक चिन्हाचा पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच शिंदे गटानेही शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावावर दावा सांगितला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा दोन्ही गटांमध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशांनुसार, शिवसेना हे नाव ठाकरे आणि शिंदे दोघांनाही वापरता येणार नाही. त्याऐवजी हे दोघे शिवसेना आणि इतर काही असं नाव वापरू शकतात. म्हणजे शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट - अशा पद्धतीने इतर नावं हे दोन्ही गट वापरू शकतात.