esakal | शिवसेना नेते आनंदराव अडसुळांची ईडीविरोधात हायकोर्टात याचिका | anandrao adsul
sakal

बोलून बातमी शोधा

Anandrao adsul

शिवसेना नेते आनंदराव अडसुळांची ईडीविरोधात हायकोर्टात याचिका

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: सिटी कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा (city co operative bank scam) प्रकरणात ईडीच्या (ED) रडारवर असलेले माजी खासदार आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ (anandrao adsul) यांनी ईडीविरोधात हायकोर्टात (High court) याचिका दाखल केली आहे. ED नं दाखल केलेला गुन्हा रद्द करत अटकेपासून दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. सिटी कोऑपरेटिव्ह बँकेत ९८० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याचा संबंध आनंदराव अडसूळ यांच्याशी जोडला जात आहे.

तीन दिवसांपूर्वी ईडीचे अधिकारी आनंदराव अडसूळ यांच्या घरी गेले होते. त्यांची चौकशी सुरु असताना अडसूळ यांची अचानक तब्येत बिघडली. त्यांच्या मुंबईतल्या घरी तातडीने अॅम्ब्युलन्स बोलाविण्यात आली. गोरेगावच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं आहे.

हेही वाचा: आरे कॉलनीत बिबट्याचा महिलेवर हल्ला, दृश्य CCTV मध्ये कैद

अडसुळांना आज रूग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती आहे. मात्र ईडीचे अधिकारी तिथंच ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. या प्रकरणी न्यायालयाकडे दुपारी तातडीची सुनावणी घेण्याबाबत याचिका दाखल केली आहे.

हेही वाचा: मोबाइलचा फ्लॅश अंगावर पडला, कुर्ल्यात कोयत्याने वार करुन हत्या

अडसुळांवर काय आरोप आहे?

'सीटी बँकेमध्ये कामगार, पेंशनधारक, ९९ टक्के मराठी लोकांची खाती होते. जवळपास ९ हजार खातेधारक होते. त्या बँकेतील खातेदारांचे पैसे अवैधरित्या बिल्डरांना वाटण्यात आले. त्यात अडसूळांनी २० टक्के कमिशन घेतले. त्यामुळे बँक पूर्ण बुडाली. यामध्ये जवळपास ९८० कोटींचा घोटाळा झाला आहे. दोन वर्षांपूर्वी एफआयआर दाखल झाला आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्यामुळे ही चौकशी केली नव्हती', असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. त्यानंतर आनंदराव अडसूळ यांची ईडीची चौकशी सुरू झाली आहे.

loading image
go to top