शिवसेनेच्या नार्वेकरांनी 25 वेळा फोन केला : वडेट्टीवार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

"वर्षा'वरून आपल्याला एकही फोन आला नाही, पण पण नार्वेकरांनी मला अक्षरशः गळ घातल्याचे वडेट्टीवार म्हणाले. तुम्ही शिवसेनेत जाणार का?

नागपूर : शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकरांनी मला 25 वेळा फोन केला. मी 23 वेळा तो उचलला नाही, पण दोन वेळा मी त्यांचा फोन उचलला. हा फोन मातोश्रीवरून होता की नाही, ते माहीत नाही. आमचे सरकार येणार आहे. तुम्ही आमच्या पक्षात या, तुम्हाला आम्ही कॅबिनेट मंत्री बनवू, असे नार्वेकर म्हणाले. मी आहे तेथेच खूष असल्याचे त्यांना सांगितले, असा दावा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला. 

आपल्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. "वर्षा'वरून आपल्याला एकही फोन आला नाही, पण पण नार्वेकरांनी मला अक्षरशः गळ घातल्याचे वडेट्टीवार म्हणाले. तुम्ही शिवसेनेत जाणार का? या प्रश्‍नाच्या उत्तरात ते म्हणाले की, मला कॉंग्रेस सोडून जायचे असते तर नार्वेकरांचा फोन मी गुप्त ठेवला असता आणि संधी बघून पक्ष सोडून गेलो असतो. पण मी आहे तेथेच खूश आहे.

सत्तेत राहुनच कामे करायची असतात असे नाही. तर विरोधी बाकावर बसून विरोधी पक्षाकडे असलेली विविध आयुधे वापरूनही जनतेची कामे करता येतात. युतीचे नेते सध्या कामे करण्याचे सोडून यात्रा करत फिरत असल्याची टीकाही त्यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena leader offer to me for enters party says Congress leader Vijay Wadettiwar