esakal | अनिल परबांना अडचणीत आणण्याच्या आरोपांवर रामदास कदमांचं स्पष्टीकरण | Ramdas kadam
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdas Kadam

अनिल परबांना अडचणीत आणण्याच्या आरोपांवर रामदास कदमांचं स्पष्टीकरण

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: एका ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मागच्या काही दिवसांपासून शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab) अडचणीत सापडले आहेत. रिसॉर्ट बांधणीत अनियमितता केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एकूणच या सर्व प्रकरणात कोकणातील शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas kadam) यांनी किरीट सोमय्यांना (kirit somaiya) रसद पुरवल्याचा आरोप केला जात आहे. एक कथित ऑडिओ क्लिप (Audio clip) व्हायरल झाली आहे. त्यामध्ये रामदास कदम आणि स्थानिक आरटीआय कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांचा आवाज आहे. खेडचे नगराध्यक्ष आणि मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी ऑडिओ क्लिपच हे प्रकरण समोर आणलं आहे.

दरम्यान रामदास कदम यांनी त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अनिल परब यांच्याविरोधात मी काहीही केलेलं नाही. कोणाला कुठलीही कागदपत्र दिलेली नाहीत असं म्हटलं आहे. "माझ्यावरील सर्व आरोप खोटे असून तूसभरही त्यात सत्य नाही. मी किरीट सोमय्यांना मागच्या अनेक वर्षात पाहिलं सुद्धा नाहीय" असं रामदास कदम यांनी सांगितलं.

हेही वाचा: गांधी जयंतीला 'गोडसे जिंदाबाद' टि्वट करणाऱ्यांना वरुण गांधींनी सुनावलं

"माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम आणि वैभव खेडेकर हे दोघे शिवसेनेत होते. माझ्या हाताखाली काम केलं आहे. वैभव खेडेकर नगराध्यक्ष आहेत. त्यांची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरण बाहेर काढली आहेत. खोट्या क्लिप काढून माझी बदनामी करण्याचा कार्यक्रम सुरु आहे"

हेही वाचा: IPL 2021 : मुंबई इंडियन्स अर्धा संघ तंबूत

"किरीट सोमय्यांशी माझा दुरान्वयेही संबंध नाही. मी कडवा सैनिक आहे. अनिल परब माझे मित्र आहेत. माझ्या मुलाला अनिल परब सहकार्य करत असतात" असे रामदास कदम म्हणाले.

loading image
go to top