
उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय व्यवसायिक असलेले शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची ईडी चौकशी सुरू झाली आहे.
'हिसाब तो देना पडेगा'; सोमय्यांचे ठाकरे सरकारला चॅलेंज
मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांची ईडी चौकशी सुरु आहे. भाजपाचे किरीट सोमय्या यांनी दिलेल्या पुराव्यानंतर आता आघाडी सरकारमधील रविंद्र वायकर यांची ईडीने चौकशी सुरु केली आहे. दरम्यान सोमय्या यांनी शिवसेना नेते रवींद्र वायकर (त्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्यावसायिक संबंध आहेत) ईडीच्या चौकशीत अडकले असून 'हिसाब तो देना पडेगा' असे ट्वीट करत, ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

ते म्हणतात, उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय व्यवसायिक असलेले शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची ईडी चौकशी सुरू झाली आहे. मोठे बिल्डर आणि महापालिका कॉन्ट्रॅक्टर यांच्याद्वारे मिळालेल्या संबंधित सर्व गोष्टींची चौकशी व्हायला हवी. दरम्यान, रविंद्र वायकर यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यावसायिक संबंध आहेत. वायकर यांची ईडीकडून तब्बल आठ तास चर्चा सुरु होती. मात्र ही चौकशी कोणत्या प्रकरणासाठी केली हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे.
मागील काही दिवसांपासूनत किरीट सोमय्या यांनी दिलेल्या पुराव्यानुसार आघाडीतील अनेक नेत्यांवर ED आणि वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी धाडी टाकल्या आहेत. याची सुरवात शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यापासून झाली. त्यानंतर अनिल देशमुख, अजित पवारांचे नातेवाईक, हसन मुश्रीफ, भावना गवळी आणि अर्जुन खोतकर, प्राजक्त तनपुरे या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीच्या धाडी पडल्या. तसेच अनिल परब, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांवर आरोप झाले.