आमचेही दिवस येतील; ईडीच्या कारवाईवरुन राऊतांचा भाजपवर निशाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut

शिवसेना खासदार भावना गवळी आणि मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठवली असून कारवाई सुरु केली आहे. याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

आमचेही दिवस येतील; ईडीच्या कारवाईवरुन राऊतांचा भाजपवर निशाणा

मुंबई- शिवसेना खासदार भावना गवळी आणि मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठवली असून कारवाई सुरु केली आहे. याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. नोटीसा पाठवल्या जात आहेत. पाठवू द्या. काही गोष्टी खणून काढल्या जात आहेत. पण, या खड्ड्यात तुम्ही देखील पडू शकता, असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ईडीच्या कारवाईला आम्ही सामोरे जाऊ, ईडीला आम्ही धमकी देणार नाही. शिवसेनाला टार्गेट केलं जात आहे. टार्गेंट का केलं जातंय हे आपल्याला माहिती आहे. पण, यामुळे महाविकास आघाडीवर काहीही परिणाम होणार नाही. शिवसेनेचे मनोधैर्य खचणार नाही, असंही ते म्हणाले. (Maharashtra Latest News)

कायदेशीर लढाया त्याच पद्धतीने लढायच्या आहेत. अनिल परब हे स्वत: वकील आहेत. त्यामुळे त्यांना याला कसं सामोरं जायचंय हे नक्की माहिती आहे. सुडाची भावना आणि बिनबूडाचे राजकारण यातून ही कारवाई होत आहे. सगळ्यांचे दिवस येतात, दिल्लीत आमचेही येतील. संस्था हातात असल्यास कारवाया होत असतात. पण, कर नाही त्याला डर कशाला. ईडी आणि भाजपची हातमिळवणी आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

हेही वाचा: सचिन वाजेच्या ह्रदयात तीन ब्लॉक, हार्ट सर्जरी आवश्यक

अनिल परब सरकारमधील महत्त्वाचे मंत्री आहेत. त्यापेक्षा पक्षाचे सहकारी, उपनेते युवाप्रमुख आहेत. ईडीच्या नोटिसीची टायमिंग पाहिली तर भाजप नेते अनेकदा त्यांचे नाव घेत होते. ईडीने एक डेस्क भाजप कार्यालयात मांडलाय किंवा भाजपच्या एखाद्या अधिकारी, पदाधिकाऱ्याने ईडी कार्यालयात आपला डेस्क टाकला आहे. त्यामुळे हे असं होऊ शकतं, अशी टीका राऊतांनी केली.

नोटिस पाठवल्याने सरकार कमजोर होईल, सरकार वाकेल. सरकारला तडे जातील आणि टपून बसलेल्या डोंबकावळ्यांना काही फायदा होईस असं काही होणार नाही. असे अनेक घाव आम्ही पचवले आहेत. त्यामुळे आमच्या नेत्यांची चिंता करु नका. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर झालेली कारवाई कायदेशीर होती. एखादी जबाबदार व्यक्ती कायद्याचे पालन न करताना बेजाबदार वक्तव्य करत असेल तर कारवाई होऊ शकते. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची आरती करायची का? आम्ही इशाऱ्यांची परवा करत आहेत. त्यांनी कोणत्याही शस्त्रांचा वापर करावा, असंही संजय राऊत म्हणाले.

Web Title: Shivsena Leader Sanjay Raut Press Conference On Bhawna Gawali Anil Parab Ed Raid

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sanjay Raut