सचिन अहिरांना कोणतंही आश्वासन नाही : संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

मुख्यमंत्रीपद ज्या पक्षाकडे असतं त्या पक्षामध्ये जाण्यात लोकांचा कल अधिक असतो.मात्र शिवसेनेत दोन नेते आले असून शिवसेनेची विचारधारा पटल्याने ते आले आहेत. उगवत्या सुर्याला नमस्कार करणं सध्याची परिस्थिति आहे. आपली खुर्ची टीकवायची आणि मग देश आणि समाज टिकावायचा अश्या विचारांची राजकारणात लोकं आहे.

मुंबई : सचिन अहिर यांना शिवसेनेची विचारधारा पटल्याने ते आले आहेत, त्यांना कोणतंही आश्वासन दिलं नसल्याचं शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. राजकारण हे साधु संतांचे राहिले नाही. पक्ष निष्ठा, विचार याला फारसं महत्त्व राहिलं नाही. मात्र शिवसेनेत येणाऱ्या लोकांना पारखून घेतलं जातं असल्याचं ही ते प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हणाले.

मुख्यमंत्रीपद ज्या पक्षाकडे असतं त्या पक्षामध्ये जाण्यात लोकांचा कल अधिक असतो.मात्र शिवसेनेत दोन नेते आले असून शिवसेनेची विचारधारा पटल्याने ते आले आहेत. उगवत्या सुर्याला नमस्कार करणं सध्याची परिस्थिति आहे. आपली खुर्ची टीकवायची आणि मग देश आणि समाज टिकावायचा अश्या विचारांची राजकारणात लोकं आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे पन्नास नेते भाजपच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. गिरिश महाजन देशाचे मोठे नेते आहेत. कोण कुठे जातय हे त्यांना जास्त माहिती असते, असं सांगत राऊत यांनी महाजन यांना ही चिमटा काढला. विरोधी पक्ष टीकला पाहिजे. एखाद्या पक्षात गेल्यामुळे कुुणी शुद्ध होतं या मताशी मी सहमत नाही. काँग्रेसमध्ये चोर, डाकू लोकं गेली होती मग ती शुध्द झाली का असा सवाल की राऊत यांनी उपस्थित केला.

शिवसेना लोकांना पारखून प्रवेश देत आहे. हे आम्ही नाही केलं तर दुसरं कोणीतरी करणार,आपलं अस्तित्व टीकवण्यासाठी हे करावं लागतं. राजकारणात विचारधारा उरली नाही, गरज आणि तडजोड म्हणून अनेक लोकं निर्णय घेत असतात. अनेक लोकांनी संघाला शिव्या दिल्या पण आज ते त्यांच्या सोबत आहेत.आपण निवडणुक हरू यासाठी हे होतंय, निवडणूक आली की आयाराम-गयाराम सुरु होत असल्याचं ही राऊत म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena leader Sanjay Raut says doesnt any promise to Sachin Ahir