शिवसेनेला सत्तेत असतानाही धक्का; मनसेत इनकमिंग

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 January 2020

शिवसेनेला सत्तेत असतानाही धक्का बसला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत इनकमिंगला सुरवात झाली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे खंदे समर्थक सुहास दशरथे हे मनसेत प्रवेश करणार आहेत.

मुंबई : शिवसेनेला सत्तेत असतानाही धक्का बसला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत इनकमिंगला सुरवात झाली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे खंदे समर्थक सुहास दशरथे हे मनसेत प्रवेश करणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

औरंगाबादमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसणार असून राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्यामुळे प्रवेश करणार असल्याचे सुहास दशरथे यांनी स्पष्ट केले आहे. सुहास दशरथे हे शिवसेनेचे औरंगाबाद लोकसभा संघटक आहेत. त्यांनी आज (ता.२०) कृष्णकुंजवर जाऊन मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली.

जवानाच्या लग्नाची जय्यत तयारी चालू होती, पण तो पोहोचू शकला नाही; कारण...

सुहास दशरथे यांच्या माध्यमातून शिवसेनेसोबतच माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. राज ठाकरे यांनी आपली भूमिका थोडीशी बदल हिंदुत्ववादी भूमिका करण्याकडे त्यांचा कल दिसत आहे. आगामी काळात या गोष्टीचा त्यांना फायदा होईल असे बोलले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena leader suhas dashrathe may enters in MNS