शिवसेनेचा 'पाचवा' नेता ईडीच्या रडावर; मंत्र्यांचाही पाय खोलात | Anil Parab ED Raid | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ED

शिवसेनेचा 'पाचवा' नेता ईडीच्या रडावर; मंत्र्यांचाही पाय खोलात

मुंबई : शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्यांच्या शासकीय निवासस्थानावर आज सकाळी ईडीने छापेमारी केली आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे काही नेते ईडीच्या रडारवर असून शिवसनेच्या पाच नेत्यांवर आत्तापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान परिवहन मंत्री अनिल परब हे ईडीची कारवाई झालेले शिवसेनेचे पाचवे मंत्री आहेत.

(ED Action On Shivsena Leaders)

हेही वाचा: राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी; विदर्भात तापमान चाळीशी पार

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर २७ सप्टेंबर २०२१ ला ईडीने कारवाई केली होती. सिटी बँकेतल्या घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. तसेच २४ नोव्हेंबर २०२१ मध्ये प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. टॉप सिक्युरिटी प्रकरणात यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्यावरही ईडीने ४ जानेवारी २०२१ रोजी कारवाई केली होती. त्याचबरोबर २७ सप्टेंबर २०२१ ला ईडीने अनिल परब यांना ईडीने समन्स बजावलं होतं. त्यानंतर २८ ला त्यांना चौकशीसाठी हजर राहावं लागलं होतं. तसेच शिवसेनेच्या खासदार भावना गवळी ३० ऑगस्ट २०२१ ला ईडीच्या रडारवर आल्या. त्यावेळी त्यांच्याशी संबंधित असलेल्या संस्थांवर छापेमारी करण्यात आली होती. या मंत्र्यांच्या रांगेत आता अनिल परब यांचाही सामावेश झाला आहे.

हेही वाचा: भारताचं क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानात पडलं, अमेरिकेनं दिला थेट इशारा

दरम्यान आज अनिल परब यांच्या संबंधित सात ठिकाणावर छापेमारी करण्यात आली आहे. त्याचं शासकीय निवासस्थान, खासगी निवासस्थान आणि त्यांच्या संबंधित आणखी सात ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे.

Web Title: Shivsena Leaders On Ed Action Illegal Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top