esakal | संजय राऊत म्हणतात, सेनेच्या नेत्यांनी धीर धरावा, कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

तीन पक्षांचं सरकार असल्याने आपल्याकडे पर्याय मर्यादित आहेत, ही गोष्ट लोकांनी समजून घेतली पाहिजे. तिन्ही पक्षांमध्ये सक्षम लोक आहेत.

संजय राऊत म्हणतात, सेनेच्या नेत्यांनी धीर धरावा, कारण...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : तीन पक्षांचे सरकार असल्याने आपल्याकडे पर्याय मर्यादित आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी धीर धरावा, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांच्या महाविकासआघाडी सरकारचा अखेर सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, हे सरकार स्थापनेत महत्वाची भूमिका असलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची या शपथविधी सोहळ्यास अनुपस्थिती होती. त्यांचे बंधू सुनील राऊत यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी चर्चा होती. मात्र ते स्थान न मिळाल्याने, संजय राऊत हे नाराज असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. यावर स्पष्टीकरण देताना राऊत यांनी नाराजी नसल्याचे स्पष्ट केले आहे.

खातेवाटप दोन दिवसांत 

संजय राऊत एएनआयशी बोलताना म्हणाले, की तीन पक्षांचं सरकार असल्याने आपल्याकडे पर्याय मर्यादित आहेत, ही गोष्ट लोकांनी समजून घेतली पाहिजे. तिन्ही पक्षांमध्ये सक्षम लोक आहेत. आपल्या लोकांनी थोडा धीर धरायला हवा, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत ही आनंदाची बाब आहे. काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांना दिल्लीत जावे लागते. शिवसेना-राष्ट्रवादीचं निर्णय महाराष्ट्रातच होतात.

मंत्रिमंडळाचा चेहरा अस्सल मराठी