भाजप कसले बौद्धिक घेते?, अमृतांच्या विधानावरून शिवसेनेचा टोला

shivsena manisha kayande criticized amruta fadnavis mumbai traffic divorce remark
shivsena manisha kayande criticized amruta fadnavis mumbai traffic divorce remarke sakal

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. आता देखील त्या एका अजब तर्कामुळे चर्चेत आल्या आहेत. मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट वाढल्याचं अजब विधान त्यांनी केलं आहे. त्यावरूनच आता शिवसेना नेत्या मनिषा कायंदे (Shivsena Leader Manisha Kayande) यांनी अमृतांना टोला लगावला आहे.

shivsena manisha kayande criticized amruta fadnavis mumbai traffic divorce remark
भाजप आणि आरएसएस एकदम पुरोगामी : अमृता फडणवीस

मुंबईतील ट्राफीकमुळे ३ टक्के घटस्फोट होतात असा मामींना नवा शोध लावला आहे. उत्तनच्या म्हाळगी प्रबोधिनीत भाजप कसले बौद्धिक घेते? कधी तरी मामीलाही बोलवा, असा टोला डॉ. मनिष कायंदे यांनी अमृता फडणवीसांना लगावला आहे.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस? -

मी घराच्या बाहेर पडते तेव्हा मुंबईतील रस्त्यावर सर्वत्र खड्डे दिसतात. माझ्या कुटुंबाला वेळ देता येत नाही. याप्रकरणात कोणी बोलायला तयार नाही. सामान्य माणूस म्हणून मी बोलत असतो. मला देवेंद्र फडणवीसांची पत्नी समजू नका. एक सामान्य नागरिक म्हणून मी समस्या मांडत असते. या मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे तीन टक्के घटस्फोट झाले आहेत, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

किशोरी पेडणेकरांचा टोला -

सामान्य स्त्रीमधील एक वेगळ दर्शन अनुभवायला मिळालं. त्यांनी आज पुन्हा मोठा जावईशोध लावला. मुंबईतील 100 टक्के रस्ते हे गुळगुळीत आहेत असा दावा आम्ही कधीच केला नाही. पण ज्या ठिकाणी समस्या आहेत त्या ठिकाणी कामे करत आहोत आणि करत राहू, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com