
Shivsena: अलिबाबा चालिस चोर सारखं आम्ही शिंदे बाबांचे चालिस आमदार - गुलाबराव पाटील
एकनाथ शिंदेंच्या बंडापासून शिंदे आणि ठाकरे गटामधून विस्तव जात नाहीये. दोन्ही गटांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरूच आहे. अशातच आता गुलाबराव पाटलांच्या एका वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. तुम्ही गोधडीतही नव्हता, तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत, असंही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
शिंदे गटात सामील झाल्यापासूनच गुलाबराव पाटलांनी सातत्याने ठाकरेंवर टीका करण्याचं सत्र सुरुच ठेवलं आहे. तसंच त्यांनी आपण अलिबाबा चालिस चोर प्रमाणे शिंदे बाबा के चालिस आमदार आहोत, असंही म्हटलं आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर काही लोक म्हणतात की तेरा क्या होगा कालिया? मात्र आहे, आमचा गब्बर आहे, असं विधानही पाटलांनी करत विरोधकांना टोला लगावला आहे.
गुवाहाटीला गेल्यावरचा एक अनुभवही पाटलांनी सांगितला आहे. गुवाहाटीला गेल्यावर घरच्यांनी परत या परत या म्हणत फोन केले. पण आता आम्ही परत येत नाही, असं आम्ही ठणकावून सांगितलं. ज्याप्रमाणे अलिबाबा के चालिस चोर तसं आम्ही शिंदे बाबा के चालिस आमदार आहोत, असंही पाटील म्हणाले आहेत.