Santosh Bangar l प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकीत एक हजार कोटी घेतले; शिवसेना आमदारांचा गंभीर आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prakash Ambedkar

प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकीत एक हजार कोटी घेतले; संतोष बांगर

नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणारे शिवसेना आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यावर निवडणुकीमध्ये एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जवळा बाजार येथील शिव संपर्क अभियान अन्तर्गत आयोजित सभेमध्ये बोलताना त्यांनी आरोप केला.

हेही वाचा: रत्नागिरी लैंगिक अत्याचार प्रकरण; चित्रा वाघ म्हणाल्या, पोलिस फक्त...

आंबेडकर यांच्यावर निशाणा साधताना बांगर म्हणाले, सर्व बौद्ध समाजाने वंचित बहुजन आघाडीला मोठ्या संख्येने मतदान केले. तिकडे प्रकाश आंबेडकर यांनी एक हजार कोटी रुपये घेतले. सभास्थानी ते हेलिकॅप्टरने पोहचतात. मग हेलिकॅप्टर आलं कुठून असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा: फडणवीसांनी वडिलांना दिलेला शब्द पाळला ; सदाभाऊंनी सांगितली आठवण

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियान राबविण्यासाठी राज्यातील सर्व शिवसेना खासदार व आमदारांची शुक्रवारी (ता.२५) बैठक घेतली. हा कार्यक्रम हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसैनिक जोडण्यासाठी आणि पक्ष विस्तार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला निरीक्षक नेमले. हिंगोली जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून कोल्हापूर लोकसभेचे खासदार संजय मंडलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Shivsena Mla Santosh Bangar Election Fraud Allegations On Prakash Ambedkar Political

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top