Shivsena: दसरा मेळावा पार पडताच ठाकरेंना दणका? एकनिष्ठ आमदाराला एसीबीची नोटीस

shivsena mla vaibhav naik probed acb notice to attend enquiry on 12 october
shivsena mla vaibhav naik probed acb notice to attend enquiry on 12 october Twitter

सिंधूदुर्ग : एकनाथ शिंदे यांच्या बंडाननंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याचे दिसून आले. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. यादरम्यान उद्धव ठाकरेंची साथ न सोडलेले कोकणातील कणकवलीचे आमदार वैभव नाईक यांची एसीबीकडून चौकशी करण्यात आली आहे.

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर केलेल्या भाषणात शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला होता. तसेच शिवसेना कोणाची यावरून देखील शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात वाद सुरू आहेत. यादरम्यान संजय राऊत यांच्यानंतर इतरही ठाकरे गटाचे निष्ठावंत आमदार चौकशीच्या फेऱ्यात अडकताना दिसत आहेत. वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उध्दव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहीलेले शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत.

shivsena mla vaibhav naik probed acb notice to attend enquiry on 12 october
Phone Tapping Case: सरकार बदलताच रश्मी शुक्ला 'क्लीन', फडणवीसांची घेतली होती भेट

आज नाईक यांची रत्नागिरी एसीबीच्या पथकाकडून कणकवली येथील शासकीय विश्रामगृहावर एक तास चौकशी करण्यात आली. एसीबीचे पोलीस उपाधीक्षक सुशांत चव्हाण यांनी वैभव नाईक यांना १२ ऑक्टोबर पर्यंत खर्च आणि मालमत्तेचे विवरणपत्र सादर करण्याचे लेखी पत्र दिले आहे. या चौकशीनंतर हा प्रकार म्हणजे दबाव तंत्राचा प्रकार असून असे कितीही प्रकार केले तरी आम्ही त्याला भीक घालत नाही. असे नाईक यांनी म्हटले आहे.

shivsena mla vaibhav naik probed acb notice to attend enquiry on 12 october
Vande Bharat Express: आधी म्हशी आता गायी! वंदे भारत ट्रेनला पुन्हा धडक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com