esakal | चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याने महाराष्ट्राला काही फरक पडत नाही - संजय राऊत | Sanjay raut
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut chandrakant patil

चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याने महाराष्ट्राला काही फरक पडत नाही - संजय राऊत

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: "महाराष्ट्रात काही लोकांना दोन वर्षात कामधंदा उरलेला नाहीय. त्यांनी सुरु केलेल्या नाट्यचळवळीला उत्तर दिलं जाईल. संपूर्ण नियम, कायदा याचे भान ठेवून शिवसेनेचा (Shivsena) दसरा मेळावा होत आहे. त्यामुळे या मेळाव्यावर कोणी टीका करत असेल, तर त्याला अर्थ नाही" असे संजय राऊत (Sanjay raut) म्हणाले. "शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून उद्या या देशाच्या, महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी. राज्याच्या विकासाविषयी अनेक प्रश्नावर भाष्य केलं जाईल" असे राऊत यांनी सांगितले.

"शिवसेनेचा दसरा मेळावा ऐतिहासिक असतो. शिवतीर्थावर लाखो लोक देशभरातून येतात. कोरोनामुळे दोन वर्ष शिवतीर्थावर हा मेळावा झालेला नाही. यावेळी शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याचा विचार करत होतो. पण मेळावा झाला असता, तर हजारो, लाखो लोक येणार. कायदा मोडण्याचा आरोप आमच्यावर होणार. त्यामुळे षणमुखानंद हॉलमध्ये हा मेळावा होत आहे" असे संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा: दोन वर्षात अनेक गोष्टी घडल्या त्याबाबत बोलायचे आहे - पंकजा मुंडे

महाविकास आघाडीला या मेळाव्याचे निमंत्रण आहे का? त्या प्रश्नावर शिवसेनेचा हा मेळावा आहे, असे उत्तर राऊत यांनी दिले. पेट्रोल-डिझेलच्या प्रश्नावर २०२४ मध्ये पेट्रोल-डिझेलचा राक्षस जाळायचा आहे. त्याची सुरुवात उद्याच्या रावणदहनापसून करायची आहे, असे राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा: 'पदावर रावणाची ‘शुर्पणखा’ नको'; चित्रा वाघ यांचं चाकणकरांच्या नियुक्तीबाबत खोचक ट्विट

चंद्रकांत पाटील यांच्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, "चंद्रकांत पाटील बोलतायत त्यांना बोलत राहूं दे. चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याने महाराष्ट्राला काही फरक पडत नाही. त्यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. तोंडाच्या वाफा दवडणं हे विरोधी पक्षाचं काम आहे" अशी टीका राऊत यांनी केली.

loading image
go to top