
पेट्रोल, डिझेलच्या दरात घट; शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया...
मुंबई : सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील (Petrol Diesel ) उत्पादन शुल्कात अनुक्रमे आठ आणि सहा रुपयांनी कमी केले आहे. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहेत. याशिवाय, केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडर (12 सिलिंडरपर्यंत) 200 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, केंद्राच्या या घोषणेनंतर शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Shivsena Reaction After Petrol Price Cuts)
खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेल्या ट्वीटमध्ये ''झुकती है सरकार,झुकाने वाला चाहिए,आख़िरकार, देशवासियों का दर्द समझ तो आया! असे खोटक ट्वीट केले आहे.
हेही वाचा: मनसेच्या सभेला पोलिसांची परवानगी; पाळाव्या लागणार अटी
देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणीमध्ये 123.46 रुपये प्रति लिटर, तर आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये डिझेल 107.61 रुपये प्रति लिटर आहे. त्याच वेळी, पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 91.45 रुपये आणि डिझेल 85.83 रुपये प्रति लिटर असून, देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा आजचा दर 96.67 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 104.77 रुपये दराने विकले जात आहे. मात्र, आता उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार आहेत.
मोदी सरकारमध्ये महागाई कमी
निर्मला सीतारामन म्हणाल्या, "पंतप्रधान मोदींनी जेव्हापासून पदभार स्वीकारला, तेव्हापासून केंद्र सरकार गरीबांच्या कल्याणासाठी समर्पित आहे. आम्ही गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या मदतीसाठी अनेक पावले उचलली आहेत. परिणामी, आमच्या कार्यकाळात सरासरी महागाई दर पूर्वीच्या सरकारांच्या तुलनेत कमी आहे."
Web Title: Shivsena Mp Priyanka Chaturvedi Tweet After Petrol Diesel Price Cut
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..