esakal | भाजपच्या अहंकार, खोटारडेपणामुळेच राज्यावर ही वेळ : संजय राऊत 
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानंतर अरविंद सावंत हे राजीनामा देत आहेत. भाजप खोटारडं वागत असेल तर केंद्रात एका मंत्रीपदासाठी आम्ही का राहावे. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. त्यामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार का, याबाबत तुम्हीच ठरवा.

भाजपच्या अहंकार, खोटारडेपणामुळेच राज्यावर ही वेळ : संजय राऊत 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजपकडून सत्ता स्थापन न झाल्याबद्दल शिवसेनेतून दोष देणे चुकीचे आहे. भाजपच्या  अहंकार आणि खोटारडेपणामुळेच राज्यावर ही वेळ आली आहे. शिवसेनेवर याचे खापर फोडणे चुकीचे आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने असमर्थता दर्शविल्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी आता शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यांना आज (ता. ११) सोमवार सायंकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ राज्यपालांनी दिला असून, तोपर्यंत सत्ता स्थापन करू शकणार का, हे शिवसेनेला राज्यपालांना कळवावे लागणार आहे. त्यापूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपला लक्ष्य केले.

शिवसेना 'एनडीए'तून बाहेर?; अरविंद सावंत यांचा राजीनामा

राऊत म्हणाले, की शिवसेनेला फक्त 24 तासांची मुदत दिली आहे. तर, भाजपला 72 तासांची मुदत दिली होती. सरकार बनविणे आमचे कर्तव्य आहे. अनेक जणांना एकत्र आणून सरकार बनविण्यासाठी वेळ लागतो. राज्याला राष्ट्रपती राजवटीकडे ढकलायचे यांनी ठरविल्याने आम्ही राज्याला स्थिर सरकार मिळण्यासाठी बांधील आहोत. भाजपच्या प्रमुख नेत्यांचे निवेदन मी ऐकलेले आहे. ते अत्यंत दुःखद आणि खेदजनक आहे. भाजप सत्ता स्थापन करू शकला नाही, याचे खापर शिवसेनेवर फोडणे चुकीचे आहे. जे ठरलं होते तसे झाले असते तर विरोधी पक्षात बसायची वेळ त्यांच्यावर आली नसती. त्यांच्यात प्रचंड अहंकार आहे. 50 टक्के काही देणार नाही, अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर ही वेळ आली आहे. त्यांनी शिवसेनेला दोष देऊ नये. उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाटीपण्णी करू नये. ते खोटे बोलले, तेच राज्याचे गुन्हेगार आहेत. 

रास्ते की परवाह करूँगा तो... : संजय राऊत

उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानंतर अरविंद सावंत हे राजीनामा देत आहेत. भाजप खोटारडं वागत असेल तर केंद्रात एका मंत्रीपदासाठी आम्ही का राहावे. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. त्यामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार का, याबाबत तुम्हीच ठरवा, असे राऊत यांनी सांगितले.