esakal | उद्धव ठाकरेंना खोटं ठरविण्याचा कट : संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

राम जन्मभूमी प्रकरणात शिवसेनेचे योगदान खूप मोठे राहिलेले आहे. अनेक शिवसैनिकांनी बलिदान दिले आहे. शिवसैनिक त्यावेळी तिथे होते. बाळासाहेब ठाकरे या वाघाने हिंमतीने आमच्या शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडल्याचे म्हटले होते. त्यामुळे आजचा निर्णय महत्त्वपूर्ण आहे.

उद्धव ठाकरेंना खोटं ठरविण्याचा कट : संजय राऊत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी खोटारडेपणाविरुद्ध आमची भूमिका परखड शब्दांत सांगितली आहे. त्यांनी शेवटचा हातोडा मारला आहे. खोटेपणाविरोधात त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरेंचा संताप महाराष्ट्रातील जनतेने पाहिला आहे. आता यापुढे सत्तास्थापनेवर बोलणार नाही, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

रामजन्मभूमीचा आज निकाल

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तसेच आज (शनिवार) सर्वोच्च न्यायालयाकडून अयोध्या प्रकरणाचा निकाल लागणार आहे. त्याविषयीही संजय राऊत यांनी मत व्यक्त केले.

उत्सुकता 'अयोध्या' निकालाची!

राऊत म्हणाले, की राम जन्मभूमी प्रकरणात शिवसेनेचे योगदान खूप मोठे राहिलेले आहे. अनेक शिवसैनिकांनी बलिदान दिले आहे. शिवसैनिक त्यावेळी तिथे होते. बाळासाहेब ठाकरे या वाघाने हिंमतीने आमच्या शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडल्याचे म्हटले होते. त्यामुळे आजचा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गेल्या वर्षभरात दोनवेळा जाऊन आले आणि हा मुद्दा जिवंत ठेवला. त्यामुळे त्यांचेही योगदान महत्त्वाचे आहे. आमच्या भावनांचा आदर करणारा हा निकाल असेल, अशी आशा आहे. येथे प्रभू श्रीरामाचे मंदिर नक्की होईल. मंदिर बनविण्यात शिवसेनेचे योगदान आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे नेतृत्वात आम्ही पुन्हा अयोध्येला जाऊ. न्यायालयाच्या निर्णयाचा देशवासियांनी स्वीकार केला पाहिजे. गोड बातमी येईल, असे वाटते. राजकारण होत राहील. आजचा निर्णय हे सरकारचे श्रेय नसेल. 

loading image