'शरद पवारांनी निवडणुकीत रंगत आणली, उदयनराजेंना निवडणूक कठीण'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 October 2019

शरद पवारांमुळे विरोधापक्षाला फायदा होईल. काँग्रेसनेही चांगली लढत दिली. पण, राष्ट्रवादीची कामगिरी काँग्रेसपेक्षा बरी झाली. उदयनराजे भोसले यांनी आधीच भाजपकडून लढायला हवे होते. उदयनराजेंसाठी ही निवडणूक कठीण आहे. आम्ही प्रत्येक जागा जिंकण्यासाठीच लढतो.

मुंबई : यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चांगली रंगत आणली. राष्ट्रवादीची या निवडणुकीत कामगिरी चांगली राहील. उदयनराजे भोसले यांच्यासाठी लोकसभेची पोटनिवडणूक कठीण असेल, असा अंदाज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अंदाज व्यक्त केला आहे. संजय राऊत यांना शिवसेनेने निकालानंतर प्रतिक्रिया देणाऱ्या नेत्यांच्या यादीतून वगळले असले तरी त्यांनी निकालापूर्वीच आपली मते व्यक्त केली आहेत. उद्या (गुरुवार) विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार आहे.

संजय राऊत म्हणाले, की शरद पवारांमुळे विरोधापक्षाला फायदा होईल. काँग्रेसनेही चांगली लढत दिली. पण, राष्ट्रवादीची कामगिरी काँग्रेसपेक्षा बरी झाली. उदयनराजे भोसले यांनी आधीच भाजपकडून लढायला हवे होते. उदयनराजेंसाठी ही निवडणूक कठीण आहे. आम्ही प्रत्येक जागा जिंकण्यासाठीच लढतो. शिवसेनेशिवाय भाजप राज्य करू शकणार नाही. शिवसेना-भाजपला एकमेकांशिवाय पर्याय नाही. शिवसेनेला 100 जागा मिळतील असा विश्वास आहे. येणारे सरकार हे आमचेच असेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MP Sanjay Raut predicts about Maharashtra Vidhan Sabha 2019