esakal | फायटर संजय राऊतांनी रूग्णालयातून लिहिले संपादकीय!
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut writes editorial for Samana despite being hospitalized in mumbai

संजय राऊत यांचे दररोज पोस्ट होणारे ट्विट, त्यांच्या रोजच्या पत्रकार परिषदा, बहुमताची जमवाजमव करण्यासाठी केलेली धडपड अवघा महाराष्ट्र बघत आला. पण आज व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे आश्चर्याच्या सगळ्या सीमाच पार केल्या आहेत. 

फायटर संजय राऊतांनी रूग्णालयातून लिहिले संपादकीय!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेलं नाव म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत. संजय राऊत यांचे दररोज पोस्ट होणारे ट्विट, त्यांच्या रोजच्या पत्रकार परिषदा, बहुमताची जमवाजमव करण्यासाठी केलेली धडपड अवघा महाराष्ट्र बघत आला. पण आज व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे आश्चर्याच्या सगळ्या सीमाच पार केल्या आहेत. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

संजय राऊतांच्या भेटीसाठी शरद पवार लीलावतीत दाखल

आज सकाळी लीलावती रूग्णालयाच्या बेडवर अँजिओप्लास्टी झालेले संजय राऊत चक्क सामनासाठी संपादकीय लिहिताना दिसले. काल शरिरावर इतकी मोठी शस्त्रक्रिया होऊनही हिंमत न हारता त्यांनी आज संपादकीय लिहिले. त्यांच्यातला सच्चा पत्रकार जागा झाला व त्यांनी उठून कामाला सुरवात केली. एवढेच नाही, तर आज सकाळी सव्वानऊच्या दरम्यान त्यांनी ट्विट केले. 

'कोशीश करने वालों की कभी हार नहीं होती'; राऊतांचे थेट लीलावतीतून ट्विट

काल अँजिओग्राफी झालेल्या राऊतांनी आज तब्येत बरी नसतानाही ट्विट केले आहे. "लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती।' - बच्चन. हम होंगे कामयाब.. जरूर होंगे...' असे ट्विट केले आहे. शिवसेनेला बहुमत सिद्ध करता आले नसले तरी आम्ही हार मानणार नाही, असाच संदेश तर राऊतांना या ट्विटमधून द्यायचा नसेला ना... 

राज्यापाल भगतसिंह कोशियारी यांनी शिवसेनेला बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेली मुदत काल (ता. 11) संध्याकाळी साडेसातला संपली. त्यापूर्वीच साधारण दुपारी चारच्या दरम्यान संजय राऊत यांना लीलावती रूग्णालयात रूटीन चेकअपसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली. राऊतांनी हरप्रकारे धडपड करून त्यांना सत्तास्थापन करण्यात अपयश आले. मात्र त्यातूनही उभारी घेत राऊतांनी आज ट्विट केले.

संजय राऊत यांच्या प्रकृतीबद्दल अत्यंत महत्त्वाची बातमी

लीलावती रूग्णालयात राऊतांची प्रथम अँजिओप्लास्टी झाली. त्यात दोन ब्लॉकेज आढळून आल्याने डॉक्टरांनी लगेच अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला. आता राऊतांची तब्येत बरी असून लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळेल. असे सर्व असूनही त्यांनी आज लीलावती रूग्णालयातून ट्विट केले आहे. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनीही राऊतांची भेट घेतली. तर आजही उद्धव ठाकरे राऊतांना भेटण्यासाठी लीलावतीत जातील. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही आज राऊतांची भेट घेतली.

खासदार संजय राऊत लिलावती रुग्णालयात दाखल

loading image