esakal | 'कोशीश करने वालों की कभी हार नहीं होती'; राऊतांचे थेट लीलावतीतून ट्विट
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena MP Sanjay Raut tweets from Leelavati Hospital

अचानक उद्भवलेल्या या ऑपरेशनमुळे आज राऊत ट्विट करतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष होते. पण आज (ता. 12) सकाळी सव्वानऊच्या दरम्यान संजय राऊत यांनी ट्विट केलेच... तेही थेट लीलावतीमधून! 

'कोशीश करने वालों की कभी हार नहीं होती'; राऊतांचे थेट लीलावतीतून ट्विट

sakal_logo
By
टीम ईसकाळ

मुंबई : सध्या सगळ्या मीडिया जगताला प्रतीक्षा असते, ती म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ट्विटची. निवडणूकीचा निकाल लागल्यापासून ते रोजच चर्चेत आहेत, ते त्यांच्या ट्विटमुळे व पत्रकार परिषदेमुळे. राऊतांची काल लीलावती रूग्णालयात अँजिओग्राफी झाली. अचानक उद्भवलेल्या या ऑपरेशनमुळे आज राऊत ट्विट करतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष होते. पण आज (ता. 12) सकाळी सव्वानऊच्या दरम्यान संजय राऊत यांनी ट्विट केलेच... तेही थेट लीलावतीमधून! 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

खासदार संजय राऊत लिलावती रुग्णालयात दाखल

काल अँजिओग्राफी झालेल्या राऊतांनी आज तब्येत बरी नसतानाही ट्विट केले आहे. "लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती।' - बच्चन. हम होंगे कामयाब.. जरूर होंगे...' असे ट्विट केले आहे. शिवसेनेला बहुमत सिद्ध करता आले नसले तरी आम्ही हार मानणार नाही, असाच संदेश तर राऊतांना या ट्विटमधून द्यायचा नसेला ना... 

संजय राऊत यांच्या प्रकृतीबद्दल अत्यंत महत्त्वाची बातमी

राज्यापाल भगतसिंह कोशियारी यांनी शिवसेनेला बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेली मुदत काल (ता. 11) संध्याकाळी साडेसातला संपली. त्यापूर्वीच साधारण दुपारी चारच्या दरम्यान संजय राऊत यांना लीलावती रूग्णालयात रूटीन चेकअपसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली. राऊतांनी हरप्रकारे धडपड करून त्यांना सत्तास्थापन करण्यात अपयश आले. मात्र त्यातूनही उभारी घेत राऊतांनी आज ट्विट केले.

संजय राऊत यांचे पुन्हा ट्विट आणि पुन्हा...

लीलावती रूग्णालयात राऊतांची प्रथम अँजिओप्लास्टी झाली. त्यात दोन ब्लॉकेज आढळून आल्याने डॉक्टरांनी लगेच अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला. आता राऊतांची तब्येत बरी असून लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळेल. असे सर्व असूनही त्यांनी आज लीलावती रूग्णालयातून ट्विट केले आहे. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनीही राऊतांची भेट घेतली. तर आजही उद्धव ठाकरे राऊतांना भेटण्यासाठी लीलावतीत जातील. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही आज राऊतांची भेट घेतील.

राऊतांच्या अकाऊंटवर ट्विट्सचा पाऊस
गेले काही दिवस संजय राऊत सातत्याने काही ना काही सूचक ट्विट करत आहेत. मागील आठवड्यातच त्यांनी शिवसेनेच्या वाघाच्या हातात कमळ, गळ्यात घड्याळ व हाताचा उघडलेला पंजा असे कार्टून ट्विट केले होते. तर 1 नोव्हेंबरला 'साहिब... मत पालिए, अहंकार को इतना, वक़्त के सागर में कईं, सिकन्दर डूब गए..!' अशा आशयाचे ट्विट केले होते. यावर प्रश्न विचारला असता, त्यांनी मला जे योग्य वाटते तसे मी ट्विट करतो असे उत्तर दिले होते. आजच्या त्यांच्या या ट्विटमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.