esakal | विरोध करणाऱ्यांना सावरकरांसारखे दोन दिवस अंदमानमध्ये ठेवा : संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार असून, शिवसेना आणि काँग्रेस आता मित्रपक्ष आहेत. राऊत यांनी गेल्या काही दिवसांत काही वादग्रस्त वक्तव्ये केलेली आहेत. यावरून त्यांना माघारही घ्यावी लागली होती.

विरोध करणाऱ्यांना सावरकरांसारखे दोन दिवस अंदमानमध्ये ठेवा : संजय राऊत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विरोध करणाऱ्यांना त्यांच्यासारखे अंदमानमधील कारागृहात दोन दिवस ठेवले पाहिजे, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला टोला लगाविला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार असून, शिवसेना आणि काँग्रेस आता मित्रपक्ष आहेत. राऊत यांनी गेल्या काही दिवसांत काही वादग्रस्त वक्तव्ये केलेली आहेत. यावरून त्यांना माघारही घ्यावी लागली होती. राऊत हे आज बेळगावला गेले असून, कर्नाटक सरकारचा विरोध झुकारून ते गेले आहेत. त्यापूर्वी त्यांनी सावरकरांबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी अप्रत्यक्षरित्या काँग्रेस नेत्यांवर टीका केली.

राहुल गांधींना निवडून केरळमधील जनतेने चूक केली : रामचंद्र गुहा

राऊत म्हणाले, की सावरकरांचा विरोध करणारे कोणत्याही पक्षाचे असो, त्यांनी दोन दिवस अंदमानमधील सेल्युलर कारागृहात जाऊन राहावे. जेथे सावरकरांना ठेवण्यात आले होते. तेव्हा त्यांच्या बलिदान आणि योगदानाचा अंदाज येईल. सावरकर हे महान होते आणि राहतील. त्यांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांच्या मनातच वाईट आहे.