esakal | भाजप नेत्यांना शिवचरित्र पाठवू - संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

संजय राऊत

भाजप नेत्यांना शिवचरित्र पाठवू - संजय राऊत

sakal_logo
By
नामदेव कुंभार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख न टीका केली होती. या टीकेला प्रत्त्युत्तर देताना संजय राऊत यांनी कोथळा बाहेर काढण्याची भाषा केली होती. राऊतांच्या या वक्तव्यानंतर भाजपे तीव्र आक्षेप घेतला. यावर बोलताना संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देत भाजप नेत्यांना शिवचरित्र पाठवू, असे म्हणाले आहेत. पुण्यातील एका सभेत बोलताना संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेतना आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही, तर कोथळा बाहेर काढतो, असं म्हटले होते. यावरुन राजकारण आता शिवसेना विरुद्ध भाजप असं राजकारण तापलं आहे. नारायण राणे यांना अटक केल्यानंतर राज्यात शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते भिडले होते. आता संजय राऊत यांच्या वक्तव्याचा भाजपने समाचार घेतला असून आक्रमक झाले आहेत. यावर विचारले असता संजय राऊत यांनी आम्ही भाजपला शिवचरित्र पाठवू असं म्हटलेय.

राऊत म्हणाले की, “मी असं काय केलं आहे की तक्रार दाखल करावी. कोणाचा कोथळा बाहेर काढू असं म्हटलंय? ते पाठीत खंजीर खुपसत होते. पाठीत खंजीर खुपसण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. आपण समोरून वार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी समोरून वार केले आहेत. त्यांना आम्ही शिवचरित्र पाठवू. त्यातल्या एखाद्या शिवचरित्रामधील इतिहासामध्ये कोथळा काढणं म्हणजे नक्की काय? याचा त्यांनी अभ्यास केला तर त्याची आम्ही चर्चा करु.

हेही वाचा: 'शोले'चा रिमेक अन् संजय राऊत; भाजप नेत्याच्या ट्वीटची चर्चा

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडून आलेले काही जण सकाळी ब्रशही न करता त्यांना शिव्या घालू लागलेत. पण, त्याने काहीही फरक पडत नाही. राजकारणात पाठीत खंजीर खुपसणे हा शब्द उच्चारताच पूर्वी एक चेहरा समोर यायचा. आता त्या जागी दुसरा येऊ लागला आहे, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला होता.

संजय राऊत काय म्हणाले होते?

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी प्रत्त्युत्तर दिलं. आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही, तर कोथळा बाहेर काढतो असं वक्तव्य संजय राऊत यांनी पुण्यातील सभेत केलं होतं.

loading image
go to top