'शोले'चा रिमेक अन् संजय राऊत; भाजप नेत्याच्या ट्वीटची चर्चा

तुम्ही वाचलंत का भाजपच्या आमदाराचं ते ट्वीट
'शोले'चा रिमेक अन् संजय राऊत; भाजप नेत्याच्या ट्वीटची चर्चा

तुम्ही वाचलंत का भाजपच्या आमदाराचं ते ट्वीट

मुंबई: निवडणूक व्यूहरचनाकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांची महिनाभरानंतर दुसऱ्यांदा भेट झाली. शरद पवार यांच्या निवासस्थानावर जाऊन प्रशांत किशोर यांनी भेट घेतली होती. त्यानंतर बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की 2024च्या निवडणुकीत भाजपला तिसरी किंवा चौथी आघाडी कोणतेही आव्हान निर्माण करु शकत नाही. तसेच, भाजपविरोधी गटाची मोट बांधण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर होणाऱ्या बैठकीला ते उपस्थित राहणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु, या दोन वेळा झालेल्या भेटीवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी एक मजेशीर पण खोचक ट्वीट केले. (Sholay Movie Remake Shivsena Sanjay Raut Role BJP Atul Bhatkhalkar Tweet goes Viral)

'शोले'चा रिमेक अन् संजय राऊत; भाजप नेत्याच्या ट्वीटची चर्चा
"मनसुखची हत्या वाझे अन् प्रदीप शर्माच्या सांगण्यावरूनच"

"भारतीय राजकारणातील चाणक्य (स्वयंघोषित) आणि भावी पंतप्रधान (हेही स्वयंघोषितच) यांनी आज दिल्लीत बैठक घेतली. त्यात जावेद अख्तरही होते. 'शोले'चा रिमेक करण्याचा विचार आहे म्हणे... त्यात 'अन्ग्रेजो के जमाने के जेलर'च्या भूमिकेत संजयच हवा असा हट्टच साहेबांनी धरल्याची चर्चा आहे", अशा शब्दात त्यांनी या प्रकारावर खोचक शब्दात तोंडसुख घेतले.

'शोले'चा रिमेक अन् संजय राऊत; भाजप नेत्याच्या ट्वीटची चर्चा
"भाजपशी जुळवून घ्या? का? म्हणजे आम्ही पैसे खायला मोकळे होऊ?"

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी आज राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींची बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आणि ‘राष्ट्रमंच’ या नावाखाली राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींची बैठक होणार असल्याने राजकीय निरिक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘राष्ट्रमंच’ हा वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी तयार केलेले व्यासपीठ असून त्यांच्या पुढाकारानेच ही बैठक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com