महाविकासआघाडीचं ठरलंय! पाच वर्ष सेनेचाच मुख्यमंत्री : संजय राऊत

Shivsena MP Sanjay Raut speaks on CM Post in PC
Shivsena MP Sanjay Raut speaks on CM Post in PC

मुंबई : 'पुढील दोन दिवसांत सत्तास्थापनेचा निर्णय होईल, राज्यपालांकडे जाऊन बहुमत सिद्ध करू. मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार. तीनही पक्षांच्या एकमताने शिवसेनेकडे पाच वर्ष मुख्यमंत्रीपद असेल. शिवसैनिकाच्या रूपात महाराष्ट्राला मजबूत व कणखर नेतृत्व मिळेल,' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (ता. 22) पत्रकार परिषदेत सांगितले. 

भाजपकडून आम्हाला कोणतीही ऑफर आलेली नाही. आता ऑफरची वेळ संपली आहे. इंद्राचं आसन जरी दिलं तरी आता आम्हाला ते नको आहे, असा टोला राऊतांनी भाजपला लगावला आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दिल्लीतील लोक महाराष्ट्रातील सरकार नाही चालवू शकत, महाराष्ट्राची राजनैतिक कुंडली शिवसेनेचाच ठरवणार महाराष्ट्राला शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवाय असे त्यांनी ठणकावून सांगितले. 

सत्तास्थापनेच्या संघर्षात शिवमहाआघाडीच्या हालचाली सुरू असताना, आता भाजपने नवी खेळी केली आहे. भाजपच्या दिल्लीतील नेत्याने शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली, अशी चर्चा माध्यमांत आहे. पण राऊतांनी असे काहीही नसल्याचे सांगितले. काल रात्री शरद पवारांच्या निवासस्थानावर उद्धव ठाकरे व पवारांमध्ये चर्चा झाली. त्याप्रमाणे महाविकासआघाडीच्या हालचाली होतील. 

संजय राऊतांनी केलंय पुन्हा ट्विट! आजचे ट्विट वाचाच...
राऊत आज आपल्या ट्विटमधून असे म्हणतात की, 'कभी कभी कुछ रिश्तों से बाहर आ जाना ही अच्छा होता है| अहंकार के लिये नही.. स्वाभिमान के लिये!' त्यांच्या आजच्या ट्विटवरून भाजपवरची नाराजी थेट दिसून येते. काही नात्यातून बाहेर पडलेलेलच चांगले असते, अहंकारासाठी नाही, तर स्वाभिमानासाठी, असे राऊत म्हणतता. युतीच्या संबंधांवर त्यांनी ट्विटमधून थेटपणे भाष्य केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com