esakal | शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप नेत्यांनी भूमिका घ्यावी : संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

शिवाजी महाराज देशाचे दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना होऊ शकत नाही. नरेंद्र मोदी देशाचे मोठे नेते आहेत. पण, कितीही मोठा नेता असला तरी छत्रपतींशी तुलना करणे योग्य नाही. या संदर्भात महाराष्ट्रातील नेत्यांनी भूमिका घ्यावी. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना हे मान्य आहे का, त्यावर त्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी.

शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप नेत्यांनी भूमिका घ्यावी : संजय राऊत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजप कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना करणारे पुस्तक प्रकाशन झाल्याने महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. भाजपने हे पुस्तक मागे घेतले पाहिजे. तसेच या प्रकरणी शिवाजी महाराजांच्या वंशजांनी राजीनामा देऊन भूमिका घ्यायला हवी, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्राच्या अस्मितेचा सर्वोच्च मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांबरोबर भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा तुलना केल्याने संताप व्यक्त होत आहे. दिल्लीत झालेल्या संत संमेलनात 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' नावाच्या पुस्तिकेचे प्रकाशन दिल्ली भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले. पूर्वाश्रमीचे कट्टर शिवसैनिक व सध्या भाजपवासी झालेले जयभगवान गोयल यांनी हे लिहिले आहे. भाजपने मात्र यात शिवाजी महाराजांचा कोठेही अपमान झालेला नसल्याचे सांगितले आहे. 

भाजप नेते श्याम जाजू म्हणतात, शिवाजी महाराजांमध्ये असणारे गुण मोदींमध्ये...

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे, की शिवाजी महाराज देशाचे दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना होऊ शकत नाही. नरेंद्र मोदी देशाचे मोठे नेते आहेत. पण, कितीही मोठा नेता असला तरी छत्रपतींशी तुलना करणे योग्य नाही. या संदर्भात महाराष्ट्रातील नेत्यांनी भूमिका घ्यावी. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना हे मान्य आहे का, त्यावर त्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी. तसेच मी महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांच्या वंशज हे सध्या भाजपमध्ये आहेत. त्यांनीही यासंदर्भात भूमिका घ्या, असे म्हटल्यावर नाराज होण्याचे कारण नाही. संजय राऊत यांच्यावर आगपाखड करण्याचे कारण नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे. त्यांनीही आपली भूमिका योग्य असल्याचे म्हटले आहे. हे पुस्तक लिहिणाऱ्याने दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला केला होता. महाराष्ट्राचा अपमान करणारा भाजप मुख्यालयात जाऊन शिवाजी महाराजांचा अपमान करतो, त्याबद्दल भाजप नेते काहीच बोलत नाहीत. त्यांना राजकारण करण्याचा अधिकार नाही. शिवाजी महाराजांचे स्मारक बरे झाले तुमच्या हातून बांधले गेले नाही.

उद्धवजी, राऊताच्या जिभेला लगाम घाला; संभाजीराजेंकडून अरेतुरेची भाषा