होय, मी शरद पवारांच्या संपर्कात, त्यांच्याशी बोलण्यात गैर काय : राऊत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

शरद पवार यांच्याशी कोण-कोण बोलतय हे मला माहिती आहे. कोणकोणाला पोटशूळ उठला आहे, हे आम्हाला माहिती आहे. शरद पवार केंद्रातील मोठे नेते आहेत. महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन होईल. दिल्लीचे प्रदूषण महाराष्ट्रात येणार नाही. राज्यातला निर्णय राज्यातच होईल.

मुंबई : शरद पवार यांच्याशी बोलण्यात गैर काय आहे. होय, मी त्यांच्या संपर्कात आहे. शरद पवार यांना राज्यात कशाला बोलविता. ते खूप मोठे नेते आहेत, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

अद्याप सरकार स्थापनेची कोंडी कायम

संजय राऊत यांच्याकडून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवरून सतत भाजपवर टीका करण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्रीपदावर सतत दावा करण्यात येत असल्याने अद्याप भाजप-शिवसेनेत चर्चा झालेली नाही. संजय राऊत यांनी आज (मंगळवार) पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली.

शिवसेनेचे संख्याबळ 56 वरून 64 वर; 'या' आमदाराचाही पाठिंबा

संजय राऊत म्हणाले, की शरद पवार यांच्याशी कोण-कोण बोलतय हे मला माहिती आहे. कोणकोणाला पोटशूळ उठला आहे, हे आम्हाला माहिती आहे. शरद पवार केंद्रातील मोठे नेते आहेत. महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन होईल. आमची भूमिकाही वेट अँड वॉचची आहे. दिल्लीचे प्रदूषण महाराष्ट्रात येणार नाही. राज्यातला निर्णय राज्यातच होईल. महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच व्हावा. राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावे अशी भूमिका शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांचीही आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः आम्हाला राज्यपालांकडे पाठविले. शिवसेनेची भूमिका स्पष्ट करावी असे त्यांनी सांगितले होते. राज्यात प्रत्येक आमदाराची भूमिका महत्त्वाची आहे, त्यामध्ये अपक्ष आमदारांचाही समावेश आहे. राज्यात धुकं नाही, सर्वकाही पारदर्शक आहे. शरद पवार मोठे नेते असून, त्यांना राज्यात कशाला बोलविता. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. जनतेच्या मनाप्रमाणे निर्णय होणार हे निश्चित आहे. शपथ घेण्याची कोणाची मोनोपॉली नाही. आमच्याकडे सर्वकाही आहे. 

शिवसेनेची दमछाक करण्याची भाजपची रणनीती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MP Sanjay Raut talked about NCP chief Sharad Pawar