esakal | मुख्यमंत्री ठाकरे 7 मार्चला अयोध्येला जाणार : संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

मी एवढंच सांगेन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येत जाणार आहे. अयोध्येचा कार्यक्रम तयार झाला असून, रामलल्लाचे दर्शन आणि शरयूची आरती करण्यात येईल. 

मुख्यमंत्री ठाकरे 7 मार्चला अयोध्येला जाणार : संजय राऊत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अयोध्या हा आमचा श्रद्धेचा विषय असून, यामध्ये राजकारण नको. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सात मार्चला अयोध्येत जाणार असल्याचे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या 100 दिवसपूर्तीला उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला मोठे यश मिळाले होते. राज्यातील 48 जागांपैकी भाजपने 23, तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. 15 जून 2019 रोजी उद्धव यांचा अयोध्या दौरा पार पडला. त्याआधी 25 नोव्हेंबर 2018 रोजी उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होते. आता पुन्हा ते 7 मार्चला अयोध्येला जाणार आहेत.

हिंदुत्व चळवळीला राज्यघटना अमान्य; शशी थरूर यांचे वक्तव्य

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले, की मी एवढंच सांगेन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येत जाणार आहे. अयोध्येचा कार्यक्रम तयार झाला असून, रामलल्लाचे दर्शन आणि शरयूची आरती करण्यात येईल. हजारो शिवसैनिक देशभरातून येतील. मुख्यमंत्री तिथे जाणार आणि तिथे दर्शन करणं हा आमचा श्रद्धेचा विषय असून, आम्ही राजकारण करू इच्छित नाही.