esakal | Ayodhya Verdict : अयोध्या मे मंदिर, महाराष्ट्र मे सरकार : संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे, की पहले मंदिर फिर सरकार. अयोध्या मे मंदिर, महाराष्ट्र मे सरकार, जय श्रीराम. असे ट्विट केल्याने आता महाराष्ट्रातील सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Ayodhya Verdict : अयोध्या मे मंदिर, महाराष्ट्र मे सरकार : संजय राऊत

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाला देण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत 'अयोध्या मे मंदिर, महाराष्ट्र मे सरकार, जय श्रीराम!' असे ट्विट केले आहे.

बाबरी मशिदीच्या जागेत मंदिराचे अवशेष : सुप्रिम कोर्ट

संजय राऊत यांनी आज (शनिवार) सकाळी पत्रकार परिषद घेऊन राम जन्मभूमी प्रकरणात शिवसेनेचे योगदान खूप मोठे राहिलेले असल्याचे म्हटले होते. अनेक शिवसैनिकांनी बलिदान दिले आहे. शिवसैनिक त्यावेळी तिथे होते. बाळासाहेब ठाकरे या वाघाने हिंमतीने आमच्या शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडल्याचे म्हटले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गेल्या वर्षभरात दोनवेळा जाऊन आले आणि हा मुद्दा जिवंत ठेवला. त्यामुळे त्यांचेही योगदान महत्त्वाचे आहे, असे म्हटले होते.  अयोध्येतील वादग्रस्त जमीन ही रामलल्लाचीच असून, याठिकाणी राम मंदिर उभारण्यासाठी सरकारला ट्रस्ट बनवावे लागणार आहे. तसेच अयोध्येत सुन्नी सेंट्रल वक्‍फ बोर्डाला 5 एकर जमीन देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे सरकारच्या या ऐतिहासिक निकालाचे देशभरातून स्वागत करण्यात आले आहेत.  

Ayodhya Verdict : अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा 

संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे, की पहले मंदिर फिर सरकार. अयोध्या मे मंदिर, महाराष्ट्र मे सरकार, जय श्रीराम. असे ट्विट केल्याने आता महाराष्ट्रातील सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.