संजय राऊत म्हणतात, How is Josh?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 November 2019

संजय राऊत यांनी गेल्या महिनाभरापासून आपली ट्विट मालिका सुरुच ठेवली आहे. संजय राऊत यांनी महायुतीत लढलेल्या भाजपला सतत लक्ष्य केले आहे. भाजपने मुख्यमंत्रीपदावरून आपला शब्द फिरविल्यानंतर राऊत यांनी सतत भाजपवर टीका केली आहे. यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकासआघाडीचा उदय झाला होता.

मुंबई : शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यात मोलाचा वाटा उचलणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजही (गुरुवार) ट्विट करत How is Josh? असा प्रश्न राज्यातील नागरिकांना केला आहे. तसेच त्यांनी जनतेला जय महाराष्ट्र असेही म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. उद्धव ठाकरे  मुख्यमंत्री म्हणून शिवाजी पार्कवर सायंकाळी 6.40 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्याची जय्यत तयारी केली असून, राज्यभरातून एक लाख शिवसैनिक येणार आहेत. शिवाय देशभरातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकारांना निमंत्रण देण्यात आले आहे. राज्यातील शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनादेखील सोहळ्यासाठी बोलावण्यात आले आहे.

राज्यात आजपासून उद्धव सरकार  

संजय राऊत यांनी गेल्या महिनाभरापासून आपली ट्विट मालिका सुरुच ठेवली आहे. संजय राऊत यांनी महायुतीत लढलेल्या भाजपला सतत लक्ष्य केले आहे. भाजपने मुख्यमंत्रीपदावरून आपला शब्द फिरविल्यानंतर राऊत यांनी सतत भाजपवर टीका केली आहे. यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकासआघाडीचा उदय झाला होता.

शपथविधी सोहळ्यासाठी नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरेंचं निमंत्रण

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MP Sanjay Raut tweet about political situation