esakal | अब हारना और डरना मना है : संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

संजय राऊत यांच्या लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून सतत ट्विट करणाऱ्या राऊत यांनी आजही ट्विट करून एकप्रकारे मित्रपक्षांना संदेश देत भाजपला इशारा दिला आहे.

अब हारना और डरना मना है : संजय राऊत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी सरसावलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाशिवआघाडीला उद्देशून ट्विट करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अब हारना और डरना मना है असे म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

संजय राऊत यांच्या लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून सतत ट्विट करणाऱ्या राऊत यांनी आजही ट्विट करून एकप्रकारे मित्रपक्षांना संदेश देत भाजपला इशारा दिला आहे. राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की हार हो जाती जब मान लिया जाता है! जीत तब होती है जब ठान लिया जाता है! त्यामुळे त्यांनी असे लिहून आपण जिंकणारच असा संदेश एकेकाळी मित्रपक्ष असलेल्या भाजपला दिला आहे.

नव्या आघाडीसाठी जोरबैठका

शिवसेनेला काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचा सत्तास्थापन करण्याबाबतचा सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार असून, त्यानंतर शिवसेनेसोबत त्यावर चर्चा करण्यात येईल. नव्या सरकारचा अजेंडा ठरवण्यासाठी काही प्रमुख मुद्‌द्‌यांवर आघाडीच्या बैठकीत संयुक्‍त निर्णय होणार आहे, तर शिवसेनेतही सत्तेतील पदवाटपाबाबत चर्चा सुरू झाल्या असून, आगामी दोन- तीन दिवसांत समान किमान कार्यक्रमाचीही रूपरेषा तयार होईल, असे सांगण्यात येते. नव्या आघाडीला सत्तेत जाताना राज्यातील जनतेसमोर ठोस कार्यक्रम ठेवावा लागणार आहे. 

छः महीने दिए हैं, बनाओ भाई सरकार!; अमित शहांचे उघड आव्हान