esakal | शरद पवार, संजय राऊत यांचे वादळ धडकणार पुण्यात, पाहा का?
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena MP Sanjay Raut will take interview of Sharad Pawar at Pune

संजय राऊत हे सध्या नागपुरमध्ये असून, शरद पवारही नागपूरमध्येच आहेत. हिवाळी अधिवेशनात महाविकासआघाडीच्या मदतीला हे दोन्ही आल्याचे बोलले जात आहेत. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षांच्या भूमिकेवर टीका केली. तसेच शरद पवारांच्या मुलाखतीबाबत माहिती दिली.

शरद पवार, संजय राऊत यांचे वादळ धडकणार पुण्यात, पाहा का?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नेहमीच मी भेट घेत असतो. काही भेटी राजकारणापलिकडच्याही असतात. शरद पवार यांची मी 29 तारखेला पुण्यात प्रकट मुलाखत घेणार आहे, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संजय राऊत हे सध्या नागपुरमध्ये असून, शरद पवारही नागपूरमध्येच आहेत. हिवाळी अधिवेशनात महाविकासआघाडीच्या मदतीला हे दोन्ही आल्याचे बोलले जात आहेत. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षांच्या भूमिकेवर टीका केली. तसेच शरद पवारांच्या मुलाखतीबाबत माहिती दिली.

'खरी टुकडे टुकडे गँग तुमचीच'; मोदींना रेणुका शहाणेंचे सडेतोड प्रत्युत्तर...

संजय राऊत म्हणाले, ''आज सभागृहात आम्हाला सक्षम विरोधी पक्ष पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षाला पायरीवर बसायचे आहे, तर त्यांनी पायरीवर बसायचे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही मुख्यमंत्री होते. त्यांना माहिती आहे वेळ द्यावा लागतो. त्यामुळे त्यांनी वेळ द्यायला हवा. पायरीवर बसून काही होणार नाही. त्यांनी दिवसभर पायरीवर बसावे आणि प्रखर आंदोलन करावे. फडणवीसांनी आता आपली पायरी सोडू नये. सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी पायऱ्यांवर बसून आंदोलन करणे योग्य नाही. भाजपने स्वप्न बघण्याची परंपरा कायम ठेवली पाहिजे, आमचे सरकार पाच वर्षे टिकले पाहिजे. सावरकरांना कलंक म्हणणारे नेते आज भाजपमध्ये आहेत.''  

लाखो नागरिक रस्त्यावर उतरले असताना त्यांच्याशी चर्चा करणे त्याला लोकशाही म्हणतात. विद्यार्थ्यांवर बंदुका चालविणे, लाठीमार करणे यावरून तेथील परिस्थिती संकटात असल्याचे दिसत आहे. विद्यापीठात पोलिस बंदुका घुसले, त्यामुळे देशातील नागरिकांना भय दिसले. राज्यांच्या मंजुरीशिवाय सीएए, एनआरसी कायदा लागू करता येणार नाही, असेही राऊत यांनी सांगितले. 

विद्यार्थी आंदोलनावरून पुलकित भडकला; निर्मात्याला म्हणाला 'पुन्हा भेटूही नका'

खडसेंच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत
एकनाथ खडसेंबाबत बोलताना राऊत म्हणाले, की खडसेंच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. सध्या राजकारण फार विचारधारेवर चालत नाही. एकनाथ खडसे पक्ष सोडणार नाहीत.