संजय राऊत म्हणतात, हा माझा आणि माझ्या पक्षाचा अपमान

वैदेही काणेकर
Wednesday, 20 November 2019

भाजप - शिवसेनेत दरी निर्माण झाल्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची राज्यसभेत बसण्याची जागा बदलण्यात आली आहे. तिसरी रांग सोडून आता त्यांना पाचव्या रांगेत बसावे लागेल. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या राऊत यांनी राज्यसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे

नवी दिल्ली : राज्यसभेत शिवसेना गटनेते म्हणून असलेली तिसऱ्या रांगेतील जागा बदलून आता संजय राऊत यांना पाचव्या रांगेत १९९ क्रमांकाची जागा देण्यात आली आहे. त्यामुळे राऊत अस्वस्थ असून शिवसेनेचा पाणउतारा करण्यासाठी व शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठी असे केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

Exclusive : शरद पवारांनी भेटीदरम्यान मोदींना दिले पत्र; पाहा...

राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना राऊत यांनी पत्र लिहिले असून शिवसेनेला पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या रांगेत जागा मिळावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. या पत्रात राऊत म्हणतात, ''मी २००४ पासून राज्यसभेचा सदस्य आहे. शिवसेना एनडीएमधून बाहेर पडल्याची किंवा शिवसेनेला बाहेर काढल्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तरीही माझी बसण्याची जागा बदलण्यात आली आहे. हा माझा आणि माझ्या पक्षाचा अपमान आहे. माझ्या मते महाराष्ट्रात सरकार स्थापनेवरुन जे काही सुरु आहे, त्याच्याशी माझी जागा बदलण्याच्या निर्णयाचा संबंध पोहोचतो.

संजय राऊतांना आज आठवली वाजपेयींची कविता; काय आहे पाहा...

''मी गेली अनेक वर्षे शिवसेना संसदीय पक्षाचा नेता आहे. सर्वसाधारण पणे पक्षाच्या संसदीय नेत्यांना पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या रांगेत बसण्याची जागा दिली जाते. शिवसेनेला पुन्हा पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या रांगेत बसण्याची जागा मिळावी,'' अशी विनंतीही राऊत यांनी नायडू यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MP Sanjay Raut writes letter to Venkaiah Naidu