esakal | 'महाशिवआघाडी' नव्हे तर 'महाविकासआघाडी'
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavikasaghadi

या तिन्ही पक्षांकडून किमान समान कार्यक्रम राज्यात चालविण्यासाठी समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे. सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीमधील 2-2 सदस्य यामध्ये असतील. आता उद्या शिवसेनेच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक होणार आहे. या बैठकीनंतर सर्वकाही स्पष्ट होणार आहे.

'महाशिवआघाडी' नव्हे तर 'महाविकासआघाडी'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत औपचारिक सहमती झाली. यामुळे महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता या नव्या आघाडीला महाशिवआघाडीऐवजी महाविकासआघाडी असे नाव देण्यात येणार आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शिवसेनेतील शिव हा शब्द घेऊन महाआघाडीऐवजी महाशिवआघाडी असे याचे नामकरण करण्यात आले होते. पण, दिल्लीत बुधवारी झालेल्या बैठकीत महाविकासआघाडी असे याचे नामकरण करण्यात आले आहे. धर्मनिरपेक्षाच्या मुद्द्यावरून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये सहमती झाल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीतल्या बैठकीत यावर खलबतं करण्यात आली. याविषयी अंतिम निर्णय उद्या (शुक्रवार) मुंबईत होणाऱ्या तिन्ही पक्षाच्या बैठकीत होईल.

आता वेळ जवळ आली, आज पवारांना भेटणार : संजय राऊत

या तिन्ही पक्षांकडून किमान समान कार्यक्रम राज्यात चालविण्यासाठी समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे. सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीमधील 2-2 सदस्य यामध्ये असतील. आता उद्या शिवसेनेच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक होणार आहे. या बैठकीनंतर सर्वकाही स्पष्ट होणार आहे.

संजय राऊत म्हणतात, हम बुरे ही ठीक है