esakal | राज्य मंत्रिमंडळामध्ये बाबा-आबांना स्थान?; असे असेल मंत्रिमंडळ
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य मंत्रिमंडळामध्ये बाबा-आबांना स्थान?; असे असेल मंत्रिमंडळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली.

राज्य मंत्रिमंडळामध्ये बाबा-आबांना स्थान?; असे असेल मंत्रिमंडळ

sakal_logo
By
प्रशांत बारसिंग

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 23 डिसेंबरनंतर होणार असल्याने त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारचा चेहरा स्पष्ट होणार आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांमध्ये प्रादेशिक आणि सामाजिक समतोल राखण्याचा खल सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम, तर मकरंद पाटील यांना "ग्रामविकास'चे मंत्रिपद मिळण्याची शक्‍यता आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तब्बल 15 दिवसांनंतर कोणत्या पक्षांकडे कोणते विभाग असतील, याचे वाटप काल (ता. 12) करण्यात आले. सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह सात मंत्री आहेत आणि येत्या 16 डिसेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने या मंत्र्यांकडे सर्व विभागांची जबाबदारी टाकण्यात आली आहे. सहा मंत्र्यांकडील खातेवाटप तात्पुरत्या स्वरूपात असून अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

केंद्र विरुद्ध राज्ये; 'नागरिकत्व' कायद्यास पाच राज्यांचा विरोध 

यावेळी मंत्रिमंडळात आमदारांचा समावेश करताना प्रादेशिक आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये खलबते सुरू आहेत. कोणत्या मंत्र्यांकडे कोणते खाते असेल, याबाबतच्या कच्च्या याद्या तयार असून त्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्यात तिन्ही पक्षांतील जुन्या अनुभवी आणि नव्या दमाच्या मंत्र्यांचा समावेश असेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. तिन्ही पक्षांतील नाराजांना गाजर दाखविण्यासाठी किमान दोन वर्षे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात काही मंत्रिपदे रिक्‍त ठेवण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेची दोन कॅबिनेट व दोन राज्यमंत्रिपदे रिक्‍त ठेवण्यात येतील. तर काँग्रेसच्या कोट्यात एक कॅबिनेट व दोन राज्यमंत्रिपदे रिक्‍त ठेवण्यात येणार आहेत. ही पदे दोन ते अडीच वर्षांनंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात भरण्यात येणार असल्याचे समजते. 

शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस

विस्तार आणि संभाव्य खातेवाटप 
शिवसेना - 12 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्री (एकूण 16) : उद्धव ठाकरे (गृह, सामान्य प्रशासन, विधी व न्याय), एकनाथ शिंदे (नगरविकास, संसदीय कार्य, सार्वजनिक बांधकाम-सार्वजनिक उपक्रम), सुभाष देसाई (उद्योग व खनिकर्म), सुनील प्रभू (वने व पर्यावरण), आशिष जैसवाल (पाणीपुरवठा व स्वच्छता), तानाजी सावंत (जलसंधारण, रोजगार हमी), दीपक केसरकर (पर्यटन, मराठी भाषा), रवींद्र वायकर (उच्च व तंत्र शिक्षण), अनिल बाबर (कृषी व फलोत्पादन), गुलाबराव पाटील (परिवहन, माजी सैनिक कल्याण, क्रीडा व युवक कल्याण). 

राष्ट्रवादी काँग्रेस- कॅबिनेट 11 आणि 4 राज्यमंत्री (एकूण 15) : जयंत पाटील (वित्त व नियोजन), अनिल देशमुख (अन्न व नागरी पुरवठा), हसन मुश्रीफ (सहकार व पणन), छगन भुजबळ (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास), नवाब मलिक (गृहनिर्माण, कामगार व अल्पसंख्याक विकास), डॉ. राजेंद्र शिंगणे (सार्वजनिक आरोग्य), जितेंद्र आव्हाड (सामाजिक न्याय), राजेश टोपे (राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास), मकरंद पाटील (ग्रामविकास). 

काँग्रेस- कॅबिनेट 8 आणि 4 राज्यमंत्री (एकूण 12): बाळासाहेब थोरात (महसूल, मदत व पुनर्वसन), पृथ्वीराज चव्हाण (सार्वजनिक बांधकाम), अशोक चव्हाण (ऊर्जा, अपारंपरिक ऊर्जा), विजय वडेट्टीवार (आदिवासी विकास, वस्त्रोद्योग), सतेज पाटील (शालेय शिक्षण व वैद्यकीय शिक्षण), डॉ. नितीन राऊत (पशुसंवर्धन व दुग्धविकास), वर्षा गायकवाड (महिला व बालविकास).