अखेर ठरलं! खातेवाटपावरून महाविकासआघाडीत एकमत?

Mahavikasaghadi
Mahavikasaghadi

मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर आज (बुधवार) शिक्कामोर्तब होणार असून, महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये खातेवाटप झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. शिवसेनेकडे गृह, राष्ट्रवादीकडे अर्थ, कृषि आणि काँग्रेसकडे महसूल खाते गेल्याची माहिती मिळत आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन तेरा दिवस झाल्यानंतरही मंत्रिमंडळ अद्याप अस्तित्वात आलेले नाही. आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षाचे नेते एकत्र येऊन विस्ताराचा प्रश्‍न मार्गी लावणार आहेत. आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर खातेवाटप अधिकृत जाहीर करण्यात येणार आहे. खातेवाटपावर तोडगा काढण्यासाठी महत्वाची बैठक काल बैठक झाली. विधानभवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दालनात सुरू असलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते.

खातेवाटपाला तेरा दिवसांनंतरही मूहूर्त सापडलेला नाही. ही बाब राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असल्याचे विधिमंडळातील नोंदीवरून पुढे आली आहे. यंदा सरकार स्थापन करण्यास बराच उशीर झाला. मुख्यमंत्रिपदाच्या वाटपावरून शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. या प्रक्रियेला निकालानंतर जवळपास एक महिन्याचा कालावधी उलटला. विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ ऑक्‍टोबरला लागला असताना, ठाकरे सरकारचा शपथविधी २८ नोव्हेंबर रोजी झाला. 

असे असेल खातेवाटप :
राष्ट्रवादी

वित्त आणि नियोजन
गृहनिर्माण
कृषी
सार्वजनिक आरोग्य
सहकार
सार्वजनिक बांधकाम

शिवसेना
गृह
नगरविकास
परिवहन
उद्योग
सामाजिक न्याय
पर्यावरण
उच्च व तंत्रशिक्षण

काँग्रेस
महसूल
ऊर्जा
जलसंपदा 
आदिवासी विकास
वैद्यकीय शिक्षण
शालेय शिक्षण
महिला व बालकल्याण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com