महाशिवआघाडीची बैठक सुरु; फॉर्म्युला ठरणार?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी देशोधडीला लागला आहे. त्याचा संताप आज मुंबईत दिसून आला. शेतकरी नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी मोर्चा काढून सरकारने ओला दुष्काळ करावा अशी मागणी केली आहे.

मुंबई : सत्ता स्थापनेसाठी तीनही पक्षांची बैठक सुरू असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत सत्तेच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

या बैठकीत कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आणि खातेवाटप यावर चर्चा झाल्याचे कळते. या बैठकीनंतर पुन्हा राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची बैठक होणार आहे. आघाडी सरकार स्थापन करण्याच्या पार्श्‍वभूमी आजची बैठकही महत्त्वाची मानली जात आहे.

फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावात शरद पवार; शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी देशोधडीला लागला आहे. त्याचा संताप आज मुंबईत दिसून आला. शेतकरी नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी मोर्चा काढून सरकारने ओला दुष्काळ करावा अशी मागणी केली आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यातच आज सत्ता स्थापनेसाठी तीनही पक्षांची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीनंतर पुन्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बैठक होणार आहे.

बच्चू कडू ताब्यात; राष्ट्रपती राजवटीत मोर्चाला परवानगी नाही? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena NCP and Congress leaders meeting starts in Mumbai