फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावात शरद पवार; शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

Sharad Pawar
Sharad Pawar

नागपूर : सरकारकडून काहीच मदत मिळालेली नाही, कोणी पाहणी करायला सुद्धा आले नाही, पिकाला भाव नाही अशा व्यथा जाणून घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ओला दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली.  

फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या काटोलजवळील पेटरी या गावात जाऊन शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या व्य़था जाणून घेतल्या. शरद पवार यांनी थेट बांधावर जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांसोबत माजी मंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात लढलेले काँग्रेस नेते आशीष देशमुख उपस्थित होते. 

सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटला नसला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार आज (गुरुवारी) सकाळी दोन दिवसांच्या विदर्भाच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यात ते ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. या धावपळीतही पवार पीकपाण्याचा आढावाच नव्हे तर बांधावर जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांची भेटी घेत आहेत. यामुळे त्यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व आले आहे. 14 नोव्हेंबरला ते पूर्व विदर्भातील पीकपाण्याची पाहणी करणार आहेत. गुरुवारी मुक्काम केल्यानंतर 15 नोव्हेंबरला कडबी चौक स्थित मेकोसाबाग शाळेच्या मैदानावर बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आदिवासी बचाव आंदोलनाचे राष्ट्रीय संरक्षक सतीश पेंदाम यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला दुपारी दोन वाजता ते उपस्थित राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com