शिवसेनेचा आता ‘माऊली संवाद'; शेतकरी-महिला-कामगारांशी संवाद

संजय मिस्कीन
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

राज्यातील महिला वर्गात आदेश बांदेकर हे भाऊजी म्हणून लोकप्रिय आहेत. त्याचाच लाभ उठवण्यासाठी शिवसेनेनं त्यांच्या नेतृत्वात माऊली संवाद चे आयोजन केले आहे.

मुंबई : 'विधानसभा निवडणुकीपूर्वी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा 'आदित्य संवाद' कार्यक्रम सुरू असतानाच आता शिवसेनेनं आणखी एक 'माऊली संवाद' उपक्रमाची सुरवात केलीय.

शिवसेना सचिव आदेश बांदेकर आता महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि समाजातील सर्वच घटकांतील महिलांशी 'माऊली संवाद' च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. निवडणुकीत एकुण मतदारांपैकी अर्धी मतदार संख्या ही महिलांची आहे. त्यामुळे या एव्हढ्या मोठ्या मतदार वर्गाला आकर्षित करण्यासाठी, शिवसेनेनं आदेश बांदेकर यांचा चेहरा महाराष्ट्राच्या निवडणुक मैदानात उतरवलांय. आदेश बांदेकरांचा 'माऊली संवाद' या उपक्रमाची सुरवात पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातून होणार आहे. 2 आँगस्ट पासून शिवसेनेचा 'माऊली संवाद' सुरू होणार आहे. 

राज्यातील महिला वर्गात आदेश बांदेकर हे भाऊजी म्हणून लोकप्रिय आहेत. त्याचाच लाभ उठवण्यासाठी शिवसेनेनं त्यांच्या नेतृत्वात माऊली संवाद चे आयोजन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena now starts Mauli samwad yatra in Maharashtra