KDCC Bank Election: ठाकरेंच्या जीवावर कोल्हापुरात काँग्रेसची चैनी

शिवसेना पदाधिकाऱ्यांचा घणाघात; जिल्हा बँकेत सत्तेसाठी शिवसेनेला धक्का
Balasaheb Thackeray
Balasaheb ThackerayEsakal

कोल्हापूर : जिल्हा बॅंकेच्या (Bank Election) निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीने (Congress,NCP)भाजपशी युती करून शिवसेनेला (Shivsena)धोका दिला आहे. जिल्हा बॅंकेत किती आणि कोणती जागा असावी हे ठरविण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. मातोश्रीवरूनच याची घोषणा होईल; पण शिवसेनेचे उमेदवार ठरवण्याचा अधिकार कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना कोणी दिला. ठाकरे सरकारच्या (Balasaheb Thackeray)जीवावर कोल्हापूरमध्ये (Kolhapur) कॉंग्रेस-राष्ट्रवादीची चैनी सुरू असल्याची टीका आज पदाधिकाऱ्यांनी केली. केडीसीसी बॅंकेच्या (KDCC) निवडणुकीनिमित्त जिल्हाध्यक्ष संजय पवार (Sanjay Pawar) यांनी शासकीय विश्रामगृहात पदाधिकारी, जिल्हा बॅंकेचे उमेदवार व कार्यकर्त्यांची आढावा बैठक काल घेतली.

जिल्हाध्यक्ष पवार म्हणाले, ‘‘राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. हाच फॉर्म्युला बँकेत राबविण्याचे सांगितले जात होते; पण प्रत्यक्षात कॉंग्रेस-राष्ट्रवादीने भाजपशी मिळते जुळते घेऊन सेनेला धोका दिला. जिल्हा बॅंकेत किती आणि कोणती जागा असावी हे ठरविण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. त्यांना भाजपलाच सोबत घ्यायचे होते. त्यामुळेच शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी शिवसेनेशी मिळते जुळते घेतले नाही.’’

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील म्हणाले, ‘‘राज्यात सरकार ठाकरेंचे आणि जिल्ह्यात कॉंग्रेस - राष्ट्रवादीवाल्यांच्या चैन्या सुरु आहेत. जिल्ह्यात सेनेला काना, विलांटी पुरतेचे वापरले जात आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचे नियोजन आठ दिवसात करून चालणार नाही. आता मोर्चा आणि आंदोलन करून चालणार नाही. तांत्रिक बाबींवर काम केले पाहिजे. प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. तो अधिकार केवळ शिवसेनाच आपल्या कार्यकर्त्यांना देत आहे.’’

आकाराम पाटील म्हणाले, ‘‘जिल्हा बॅंकेसाठी शहरातील पेठांमध्ये असणाऱ्या मतदारांपर्यंत पोचले पाहिजे. पेठांमधील शाखेच्या पदाधिकाऱ्याने मतदारांपर्यंत पोचले पाहिजे. त्यांना सेनेची भूमिका सांगितली पाहिजे. राज्यात ठाकरे सरकार आहे. जिल्हा बॅंकेसाठी त्याचा चांगला उपयोग करता येईल. हे ही पटवून दिले पाहिजे.’’

जिल्हा संघटक संजय जाधव (Sanjay Jadhav)म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी म्हणून गाफील राहिलो. सहकारात आम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांनी रडायला नाही तर लढायला शिकवले आहे. त्यानुसार बँकेची निवडणूक ताकदीने लढणार आहे.’’

Balasaheb Thackeray
'निवडणुकीत शिवसेना खासदारांच्या आई भाजपसोबत, किंमत मोजावी लागेल'

संजय पाटील, चंद्रकांत पाटील, तानाजी आंग्रे, संभाजी पाटील, संदीप कारंडे, मंजित माने, सुरेश पोवार, जीवन पाटील, इंद्रजित पाटील, सतीश कुरणे, बाजीराव पाटील, राजेंद्र पाटील, शुभांगी पवार, स्मिता सावंत, विराज पाटील, कृष्णात पोवार, प्रशांत पावोर सरदार पोवार उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com