शाहू महाराजांनी भाजपचा मुखवटा फाडला, संजय राऊतांचा निशाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

शाहू महाराजांनी भाजपचा मुखवटा फाडला, संजय राऊतांचा निशाणा

कोल्हापूर : सध्या राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे, यादरम्यान संजय राऊत (sanjay raut) यांनी शाहू छत्रपती महाराजांचे आभार मानले आहेत, त्यांचे आभार व्यक्त करतो, त्यांनी संभ्रम दूर केला आणि शिवसेनेला बदनाम करणाऱ्या भाजपचा मुखवटा फाडला असे म्हटले आहे

संजय राऊत म्हणाले की, शाहू छत्रपतीनी शिवसेनेला बदनाम करण्याचा देवेंद्र फडणवीस आणि कंपनीने सुरू केला त्यांचा मुखवटा शाहू महाराजांनी फाडला, कोल्हापूरच्या भूमीमध्ये अजूनही सत्य आणि प्रमाणीकपणा आहे असे संजय राऊत म्हणाले. शाहू घराण्याने सचोटी धरून ठेवली आहे असे ते म्हणाले. तसेच राऊतांनी सांगितले की, शाहू महाराज मनानं मी आजही शिवसैनिक आहे, असे म्हणाले हे शाहू महाराजांचं वक्तव्य आंबाबाईने दिलेला आशिर्वाद आहे आणि त्यासाठी आम्ही त्यासाठी आभारी आहोत.

तसेच भाजपने कारस्थान केलं, समाजात तेढ निर्माण करण्यासाठी संभीजीराजेंचा गैरवापर केला पण शाहू महाराजांनी त्यांचा मुखवटा फाडला असे राऊत यावेळी म्हणाले.

हेही वाचा: शाहू छत्रपतींच्या विधानावर संभाजीराजेंची प्रतिक्रिया; म्हणाले, मी सत्यच बोललो पण....

संभाजीराजेंचे वडील शाहू छत्रपती यांनी आज शिवसेना आणि संभाजीराजेंबाबत बोलताना , राज्यसभेसाठी अपक्ष लढण्याचा संभाजीराजे छत्रपती यांचा निर्णय वैयक्तिक होता. याबाबत त्यांनी कुटुंबियांशी सल्लामसलत केली नव्हती, त्यामुळं शिवसेनेनं त्यांना उमेदवारी नाकारण हा छत्रपती घराण्याचा अपमान असं म्हणता येणार नाही, असे म्हटले होते.

दरम्यान यावर संभाजीराजे यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे, त्यांनी लिहीलं की, "छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूण पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे. माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही"

हेही वाचा: मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांची बदली, मिळाली 'ही' जबाबदारी

Web Title: Shivsena Sanjay Raut Critisized Bjp Devendra Fadanvis Oves Shahu Chhatrapati Sambhaji Raje Rajya Sabha

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top