आम्ही समोरुन वार करतो, आणि वार झेलतो - संजय राऊत

संजय राऊत
संजय राऊत File photo

आम्ही समोरुन वार करतो, आणि वार झेलतो, त्यामुळे आता शिवसेना पाठीत खंजीर खुपसते, या विधानावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. पुण्यातील खेड येथे ते पत्रकार परिधतेत बोलत होते. यावेळी राऊत यांनी विरोधी पक्षातील नेत्यांवर टीका केली. तसेच सत्तेतील काँग्रेस नेत्यांचे कानही टोचले.

शिवसेना-काग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष ठरवून एकत्र आलेत, चोरून एकत्र आले नाहीत. राज्यात तीन पक्षांचा समनव्य चांगला आहे तो प्रदीर्घ काळ रहावा, अशी आमची इच्छा आहे. अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे शपथ घेतली तेव्हा संध्याकाळ पर्यंत ते आपल्या घरट्यात परत येतील, असं मी त्याच दिवशी सांगितलं होतं, असे राऊत म्हणाले.

खेडमधील प्रकारावर काय म्हणाले राऊत?

उध्दव ठाकरेंच्या सांगण्यावरुनच खेडला आलो होतो. जयंत पाटील यांच्याशी आम्ही चर्चा केली. स्थानिक पातळीवर राजकारण होत असते. अजित पवारांनी खेड मधील आमदाराच्या खेळीबाबत लक्ष द्यावे. शिवसेनेचे सभापती पद त्यावर आणलेला अविश्वास ठराव त्यानिमित्ताने गोंधळ झाला. पण हा शिवसेनेवर अन्याय आहे, शिवसेनेचे सदस्य पळवून नेणे, त्यांना फुटण्यासाठी आमिष दाखवलं आहे. खेड सारख्या विषयावरून कुठेतरी कटुता निर्माण होते, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आम्ही खापर फोडले नाही. पण अजित पवारांनी यात लक्ष घालावं. सरकारमध्ये आपण एकत्रित काम करतोय. हे लक्षात ठेवायला हवं, असे राऊत म्हणाले.

संजय राऊत
'...तोपर्यंत कोणी मायचा लाल सरकार पाडू शकणार नाही'

पुणे महापालिका निवडणुकीबद्दल काय म्हणाले?

पुणे महापालिका निवडणुकीबद्दल आम्ही दोन्ही पर्यायाचा विचार करत आहोत. महाविकास आघाडी बरोबर किंवा स्वतंत्रपणे. एकत्र निवडणूक लढवल्यास शिवसेनेच्या किमान 80 जागा युतीत असतील. सध्या सतेते असणारी ही आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेत राहावी अशी आमची भूमिका आहे, असे राऊत म्हणाले.

sanjay raut
sanjay raut

वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर काय म्हणाले?

शिवसेनेचे असले तरीही उद्धव ठाकरे राज्याचे, महाविकासआघाडीचे मुख्यमंत्री आहेत. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कधीकधी मंत्र्यांचा उत्साह असतो. वडेट्टीवारांच्या भूमिकेवरून थोडीफार गडबड झाली पण आघाडीत हे असं होतंच राहतं. पण हे सरकार मजबूत आहे.

...तर काँग्रेसला शुभेच्छाच -

काँग्रेस पक्ष स्वबळावर केंद्रात सत्तेवर येणार असेल तर आमच्या शुभेच्छाच आहेतच. आम्ही त्यांच्या पाठीशी राहू. बंगालमध्ये काँग्रेसनं स्वबळावर लढण्याचा प्रयत्न केला. पण काय झालं? तुम्हाला माहितच आहे. स्थानिक पातळीवर आघाडीने एकञ लढावं यासाठी आमचे प्रयत्न आहेत... नाना पटोले स्वबळावर लढणार असतील तो त्यांचा निर्णय पण मग केंद्रातही स्वबळावर निवडून यावं आम्ही पाठिंबा देऊ.

संजय राऊत
नेहरु ते राजीव गांधींच्या पुण्याईवर आज देश चाललाय - संजय राऊत

राणेंना उत्तर-

नाराणायण राणे यांनी मराठा आरक्षणावरु शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. पुण्यात बोलताना राऊत यांनी राणेंना प्रत्त्युत्तर दिलं. आमच्या मनात पाप नाही. मराठा आरक्षण प्रकरण न्याय प्रविष्ट आहे, सगळ्या गोष्टी आम्हाला काळजीपूर्वक करायच्या आहेत. भाजपच्या नेत्यांना असं वाटत आम्ही काही करत नाही, त्यामुळे केंद्राने यात लक्ष घालावं, आमचं योग्य सहकार्य असेल, असे राऊत म्हणाले.

Sharad-Pawar-Sanjay-Raut
Sharad-Pawar-Sanjay-Raut

चंद्रकांत पाटालांनाही सुनावलं-

मागील काही दिवसांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शरद पवार यांच्या टीका करण्याचा सपाटाच लावला आहे. त्यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. ते म्हणाले की, 'चंद्रकांत दादा पाटील म्हणजे वसंतदादा पाटील नाहीत. प्रमुख पदावर असताना व्यक्तीगतरित्या टीका होऊ नये, समोरच्या वर बोट दाखवताना बोटे आपल्याकडे पण असतात हे दादांनी लक्षात घ्यावे. शरद पवार यांच्यावर आरोप केल्याशिवाय यांच्या बातम्या होत नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com