MVA Vajramuth Rally : 'दादा येणार, दादा बोलणार, दादा जिंकणार' अजित पवारांवर बोलतांना राऊत म्हणाले...

Ajit Pawar - Sanjay Raut
Ajit Pawar - Sanjay RautSakal

मुंबईः महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा आज मुंबईत होत आहे. या सभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची उपस्थिती आहे. यावेळी संजय राऊत यांनी अजित पवार यांच्याबद्दल बोलून कलह दूर केला आहे.

मागच्या आठवड्यात अजित पवार भाजपमध्ये जाणार, अशा वावड्या उठल्या होत्या. त्या गदारोळात संजय राऊत आणि अजित पवार यांच्यात तू-तू..मैं-मैं.. झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये पुढेही आरोप-प्रत्यारोप होणार का? असा प्रश्न उपस्थित होत होता.

Ajit Pawar - Sanjay Raut
Jitendra Awhad : आंदोलनं चिरडली तर जास्त उफाळतात; जितेंद्र आव्हाडांनी दिला इशारा

मात्र संजय राऊत यांनी आजच्या सभेत अजित पवारांचं कौतुक केलं आहे. यावेळी अजित पवारांना उद्देशून बोलतांना संजय राऊत म्हणाले की, दादा सगळ्यांना तुमचं आकर्षण आहे. दादा येणार, दादा बोलणार आणि दादा जिंकणार... असं बोलून त्यांनी सभास्थळी टाळ्या मिळवल्या. अजित पवारही त्यांच्याकडे मिश्किलपणे बघत होते.

पुढे बोलतांना संजय राऊत म्हणाले की, काही लोक बोलले की बीकेसी मैदान छोटं आहे. तिथे होणारी सभाही लहानच होईल. परंतु असं बोलणारे चिनी डोळ्यांचे असतील, असं म्हणून त्यांनी हशा पिकवला.

काय म्हणाले संजय राऊत?

  • काही लोक म्हणाले, मुंबईतल्या सगळ्यात छोट्या मैदानावर सभा होत आहे

  • जे असं बोलले त्यांचे डोळे बहुतेक चिनी असावेत

  • दादा सगळ्यांना तुमचं आकर्षण आहे

  • दादा येणार, दादा बोलणार आणि दादा जिंकणार

  • जोपर्यंत महाराष्ट्रात शिवसेना मजबूत आहे, तोपर्यंत मुंबईचा लचका तोडता येणार नाही

  • ही भीती त्यांना होती, त्यामुळे त्यांनी शिवसेना फोडण्याचं काम केलं

  • परंतु आता शिवसेना आणखी बळकट होतेय

  • आज काँग्रेस, राष्ट्रवादी, मुस्लिम, दलित शिवसेनेसोबत आहेत

  • बोगस देशभक्तांची फौज घेऊन ते आमच्याविरुद्ध लढायला आले आहेत

  • मात्र ही वज्रमूठ घेऊन आम्ही आलो आहोत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com