'शरद पवार पंतप्रधान कधी होणार?' संजय राऊत म्हणतात, ''हिमालयाची...'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut Replied Chandrakant Patil on Sharad Pawar PM Statement

'शरद पवार पंतप्रधान कधी होणार?' संजय राऊत म्हणतात, 'हिमालयाची...'

मुंबई : राष्ट्रवादी उत्तर प्रदेश, मणिपूर आणि गोव्याची विधानसभा निवडणूक लढणार (NCP Contest 3 States Election) आहे. याबाबत स्वतः शरद पवार (Sharad Pawar) यांनी माहिती दिली. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांनी शरद पवारांसह संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) टीका केली होती. शरद पवार पंतप्रधान कधी होतील? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यालाच आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा: हिंमत असेल तर १०५ आमदारांनी राजीनामे द्या! संजय राऊत यांचे प्रत्युत्तर

शरद पवारांविषयी बोलण्यासाठी आधी राजकारण, समाजकारण आणि त्यांच्याइतक्या व्यक्तीमत्वाची उंची गाठावी. तुमच्यासारख्या टेकड्यांना सह्याद्री किंवा हिमालयाची उंची लक्षात येणार नाही. एखादी व्यक्ती पंतप्रधानपदी बसल्यामुळे मोठी होत नाही. पंडीत नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांची उंची पंतप्रधानपदी बसण्यापूर्वीच मोठी होती, असं संजय राऊत म्हणाले. तसेच अनेक चांगल्या व्यक्ती पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत, अशीही खंत राऊतांनी यावेळी व्यक्त केली.

उद्धव ठाकरेंवरील टीकेला उत्तर -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडतील? याबाबत भविष्यवाणी करावी, असा टोला देखील चंद्रकांत पाटलांनी लगावला होता. त्यावरूनही संजय राऊतांनी चोख प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांचं काम योग्यरितीने सुरू आहे. पंतप्रधान मोदींसोबत उद्या बैठकीत सहभागी झाल्यावर पाटलांना ते कळेलच, असंही राऊत म्हणाले.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते? -

ज्योतिष्य, कर्मकांड नाकारणारे शरद पवार आणि प्रबोधनकारांचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत भविष्यवेत्ते कधी झाले? उत्तर प्रदेश, गोव्यात सत्ता परिवर्तनाबाबत दावे समजू शकतो. पण छातीठोक भविष्यवाणी हे मनोरंजन आहे. या दोन्ही महापुरुषांना खरोखरच ज्योतिष्य अवगत असेल, तर त्यांनी गोवा, उत्तर प्रदेशाबद्दल बोलण्यापेक्षा महाराष्ट्राबाबत भविष्य सांगावं. राऊत यांनी सांगावं की, शरद पवार पंतप्रधान कधी होतील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडतील. याबाबत पवारांनी देखील भविष्यवाणी करावी, असं ट्विट चंद्रकांत पाटलांनी केलं.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top