..तर शिवसेना पवारांना पाठिंबा देईल - भुजबळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे अनेकदा म्हटले आहे; पण तरीही त्यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आल्यास शिवसेना मदत करू शकते, असा दावा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे केला. 

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांसाठी भुजबळ यांच्यातर्फे ‘ठाकरे’ चित्रपटाचा विशेष ‘शो’ झाला. चित्रपटामध्ये मराठी माणूस पंतप्रधान होणार काय? असा संवाद चित्रित करण्यात आला आहे. हाच धागा पकडून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना भुजबळ यांनी हा दावा केला. चित्रपट पाहताना आपल्या जुन्या स्मृती जागृत झाल्या. या चित्रपटात प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून इतरही अनेक चांगल्या पात्रांची निवड करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.

Web Title: Shivsena Sharad Pawar Support Chhagan Bhujbal Politics