'आप' मतलब्यांचा पराभव; शिवसेनेची मोदी-शहांवर टीका

Untitled-1.gif
Untitled-1.gif
Updated on

मुंबई : दिल्ली विधानसभेत अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'ने दणदणीत विजय मिळविला. तसेच भाजपची या ठिकाणी वाताहत झाली. यावरून शिवसेनेने भाजपवर 'सामना'मधून मार्मिक हल्ला केला आहे. 

दिल्लीत आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवला. आपने 70 पैकी 62 जागा जिंकत भाजपला धूळ चारळी. आपच्या विजयावर शिवसेनेने आजच्या सामना अग्रलेखातून अरविंद केजरीवाल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर, भाजप, हिंदू-मुसलमान पाकिस्तान वैगरे बोंबलत बसले. पण, शेवटी विजय केजरीवाल यांच्या आपचा झाला, असं म्हणत सामनातून भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आलं.

“केजरीवाल यांनी केलेल्या कामाच्या जोरावर सत्ता पुन्हा मिळवली हे मान्य केले पाहिजे. त्यांनी लोकांना गंडवले नाही व जे केले त्यावरच मते मागितली. केजरीवाल यांचा दिल्ली प्रदेश हा केद्रंशासित असल्याने कायदा सुव्यवस्था पोलिस, उद्योग हे विषय त्यांच्या अखत्यारीत येत नाहीत. त्याचा त्यांना फयदाच झाला. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचे साफ बारा वाजले व त्याचे खापर मोदी शहांवर फोडण्यात ते यशस्वी झाले. पण पाणी आणि वीज बिला माफीचे संपुर्ण श्रेय त्यांनी घेतले. भाजप , हिंदू-मुसलमान पाकिस्तान वगैरे बोंबलत बसले. पण शेवटी विजय केजरीवाल यांच्या आप चा झाला. आपमतलब्यां चा पराभव झाला.”

“झारखंडमध्ये पराभव झाला व ध्यानीमनी नसताना महाराष्ट्रासारखे महत्त्वाचे राज्य हातचे गेले. देशाच्या राजधानीवर ‘आप’चा झेंडा फडकला, तर आर्थिक राजधानीवर शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्य करीत आहे. हा बाण काळजात आरपार खुपणारा आहे. लोकसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर भाजपला एकापाठोपाठ एक राज्ये गमवावी लागली आहेत. चार महिन्यांपूर्वी दिल्लीतील सातपैकी सात लोकसभा जागांवर भाजपचा विजय झाला तो पंतप्रधान मोदी यांचा करिश्मा होता. मोदी किंवा भाजपसमोर एखाद्या पक्षाचे किंवा नेत्याचे तगडे आव्हान नव्हते. त्यामुळे भाजपचा एकतर्फी विजय झाला. पण विधानसभा निवडणुकीत एकीकडे राज्यांतील तगडे नेतृत्त्व आणि त्यांच्यासमोर मोदी आणि शाहांची ‘हवाबाज’ नीती फोल असे चित्र निर्माण झाले आहे. दिल्ली विधानसभेचा निकाल पाहिला तर एकटे केजरीवाल हे संपूर्ण केंद्र सरकार व शक्तिमान भाजपला भारी पडले आहेत”, असं म्हणत सामनातून भाजपवर निशाणा साधण्यात आला.

“केजरीवाल यांच्या पराभवासाठी भाजपने देशभरातील अडीचशे खासदार, दोन-चारशे आमदार, मुख्यमंत्री तसेच राज्यांचे मंत्री व संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ मैदानात उतरवले होते, पण त्या सर्व फौजांचे शेवटी दिल्लीच्या मैदानावर साफ पानिपत झाले. अहंकार, मस्तवालपणा आणि ‘हम करे सो कायदा’ या वृत्तीचा हा पराभव आहे”, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर टीका केली आहे.

“दिल्लीच्या विधानसभेत कोणत्या प्रश्नांवर निवडणुका लढवाव्यात यावर भाजपात नेहमीप्रमाणे गोंधळ उडाला. नेहमीप्रमाणे येथेही हिंदू-मुसलमान, राष्ट्रवाद आणि देशद्रोह याच विषयांवर भारतीय जनता पक्षाने प्रचार केला व मते मागितली, पण दिल्लीतील सर्वच थरांतील मतदारांनी हे सर्व विषय ठोकारुन लावले व केजरीवाल यांनी पाच वर्षांत जे काम केले त्यावरच मतदान केले. केजरीवाल यांनी पाच वर्षांत केलेल्या कामांवर मते मागितली, असे आपल्या निवडणुकीत सहसा घडत नाही. भावनिक आणि धार्मिक मुद्यांवरच भर दिला जातो. भारती. जनता पक्षाने नेहमीप्रमाणे दिल्लीत तेच केले”, असं म्हणत सामनातून भाजपवर निशाणा साधण्यात आला.

शाह यांचे ते स्वप्न...

“दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’चा विजय झाला यात आश्चर्य वाटावे असे काहीच नाही. पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षाही दिल्लीची निवडणूक गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिष्ठेची केली होती. जयप्रकाश नड्डा यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली, पण दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचे सूत्रधार अमित शहा हेच होते. पक्षाचे अध्यक्षपद सोडताना त्यांना एक विजय मिळवायचा होता. ते शक्य झाले नाही. केजरीवाल यांच्या पराभवासाठी भाजपने देशभरातील अडीचशे खासदार, दोन-चारशे आमदार, मुख्यमंत्री तसेच राज्यांचे मंत्री व संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ मैदानात उतरवले होते, पण त्या सर्व फौजांचे शेवटी दिल्लीच्या मैदानावर साफ पानिपत झाले. अहंकार, मस्तवालपणा आणि ‘हम करे सो कायदा’ या वृत्तीचा हा पराभव आहे,” अशी टीका शिवसेनेनं भाजपावर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com